मुंगली शेतशिवारात ३२ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; नवेगावबांध पोलिसात मर्ग दाखल.


Digital Gaavkari News

अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील मौजा मुंगली येथील शेतशिवारात ३२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य शहरे (वय ३२ वर्षे) यांनी आपल्या शेतातील गट क्रमांक ४२१ मध्ये असलेल्या किनीच्या झाडाला रस्सीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर १४ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास नवेगावबांध पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, नवेगावबांध पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या