डिजिटल गावकरी न्यूज.
Durgaprasad Gharatkar
गोंदिया | 25 सप्टेंबर 2025
गोंदिया जिल्ह्यात पुन्हा एकदा बिपट्याच्या हल्ल्याची भीषण घटना घडली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संजयनगर (गोठणगाव वनपरिक्षेत्र) येथे पहाटेच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिपट्याने एका पाच वर्षीय निष्पाप बालकाचा बळी घेतला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंश प्रकाश मंडल (वय ५) हा लघुशंकेसाठी आपल्या आजीसोबत घराबाहेर गेला असता दबा धरून बसलेल्या बिपट्याने त्याच्यावर हल्ला केला. बिपट्याने वंशला वाडीत ओढून नेले. आजीच्या किंकाळ्या व नागरिकांच्या आरडाओरडीनंतर बिपट्याने वंशला सोडले आणि जंगलात पसार झाला.
तत्काळ गावकऱ्यांनी वंशला केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याआधीही घडल्या घटना
या परिसरात बिपट्याच्या हल्ल्याच्या घटना नवीन नाहीत.
याआधी प्रदीप साखरे यांचा मुलगा, युक्ता चंद्रशेखर निखारे,तर विहान राय (वय ४) या बालकावर बिपट्याने हल्ला केला होता.
सलग बालकांवर होत असलेल्या या हल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.
गावकऱ्यांचा वनविभागावर संताप
गावकऱ्यांनी वनविभागावर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. वारंवार तक्रारी करूनही वनविभाग कोणतीही ठोस कारवाई करत नाही. गाई, वासरे, कोंबड्या, पाळीव प्राण्यांवर हल्ले सुरूच आहेत. आता बिपट्याचे लक्ष्य चिमुकल्या मुलांकडे वळल्याने भीती वाढली आहे.
पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत मागणी

स्थानिक नागरिक व पीडित कुटुंबीयांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की मृत बालकाच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. व हल्लेखोर बिपट्याला ताब्यात घेऊन बंदिस्त करावे. गावांमध्ये सुरक्षिततेसाठी विशेष पथके तैनात करावीत.
गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
या घटनेनंतर संतप्त गावकरी चकाजाम आंदोलनाची तयारी करत आहेत. गावकऱ्यांनी रस्ते अडवून शासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
या घटनेनंतर संतप्त गावकरी चकाजाम आंदोलनाची तयारी करत आहेत. गावकऱ्यांनी रस्ते अडवून शासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

0 टिप्पण्या