डिजिटल गावकरी न्युज
दुर्गाप्रसाद घरतकर
Arjuni morgaon: नमस्कार मंडळी गेल्या 1 महिन्यापासून अर्जुनी मोरगाव तालुक्यात जंगली हत्तीने धुमाकुळ घातला आहे मोठें प्रमाणत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहेत विशेष म्हणजे, या हत्तीच्या कळपाने १४ एप्रिल च्या रात्री बाराभाटी बोळदे परिसरातील किशोर येरणे यांचे शेतातील मका पिकाची मोठी नासधूस केली आहे. यामधे शेतकरी कैलास येरणे, नारायण येरणे, चरणदास जोशी, मारोती साउरस्कार मु.बोळदे कवठा यांचेही शेतातील मका पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली असून 2 लाखापर्यंत यांची नुकसान केली आहे.
हे जंगली हत्ती मका पिक खराब केल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. कारण या भागात मोठ्या प्रमाणत मक्काचे पीक आणी उन्हाळी भात लावला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहेत त्यातच दुसरीकडे बिबट्या व इतर वन्यप्राण्यांचाही उच्छाद वाढला असून तालुक्यातील धावेटेकडी येथील एका मुलाला बिबट्याने ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे तालुक्यात वन्यप्राण्यांची भीती निर्माण झाली असून हत्तीच्या कळपाला कायमस्वरूपी हाकलून लावण्यात व इतर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यास वनविभागाची यंत्रणा कमकुवत पडत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये आता शासनाने शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

0 टिप्पण्या