Tiger Attack News : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी येथे वाघाच्या हल्ल्यात ६ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू.


Digital gaavkari News
दुर्गाप्रसाद घरतकर

अर्जुनी मोरगाव : नमस्कार मंडळी अर्जुनी तालुक्यातील गावं आदर्श धाबेटेकडी येथे आज सायंकाळी सुमारे ५ ते ६ वाजताच्या सुमारास अत्यंत दुःखद घटना घडली. घटना मनाला हेलवून टाकणारी आहे धाबेटकरी येथील प्रज्वल गोवर्धन मेश्राम (वय ६ वर्षे) हा चिमुकला घराजवळ खेळत असताना अचानक वाघाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्या चिमुकल्याला ठार केले.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघाने काही क्षणांतच प्रज्वलला उचलून जंगलाच्या दिशेने नेले. ही घटना पाहताच कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी आरडाओरड करत परिसर आरडाओरड सुरू केली त्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली आणि शोधादरम्यान घरापासून काही अंतरावर प्रज्वल गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. मात्र, या भीषण हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडणे, लहान मुलांवर लक्ष ठेवणे आणि शक्यतो समूहानेच हालचाल करावी, असे सांगण्यात आले आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वनविभागाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून संबंधित वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या गंभीर घटनेनंतर वनविभागाच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
परिसरात वाघाचा वावर असल्याची माहिती असतानाही योग्य वेळी उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत?
गावाजवळ वाघ फिरत असताना गस्त वाढवण्यात का आली नाही? नागरिकांना वेळेवर इशारे देण्यात वनविभाग का अपयशी ठरला?

लहान मुलं आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले का उचलली गेली नाहीत? 
अशा घटना वारंवार घडत असताना वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी कारवाई का होत नाही? 

या घटनेनंतर तरी वनविभाग जबाबदारी स्वीकारणार का? 
आणि भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी नेमकी कोणती ठोस पावले उचलली जाणार, याची उत्तरे आता नागरिकांना अपेक्षित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या