लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! मे महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा; निधी वितरणाचा GR जारी.


मुंबई | प्रतिनिधी

Digital gaavkari News 

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाकडून आर्थिक वर्ष 2026-27 साठी निधी वितरणासंदर्भात 10 जून 2026 रोजी शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मे 2026 महिन्याचा प्रलंबित आर्थिक लाभ लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वित्त विभागाच्या निर्देशानुसार निधी वितरणाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून त्याअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, सुरुवातीच्या टप्प्यात अनुसूचित जाती (SC) घटकातील पात्र महिलांसाठी सुमारे 344.74 कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे संबंधित प्रवर्गातील महिलांच्या प्रलंबित किंवा येणाऱ्या हप्त्यांचे वितरण लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर इतर पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात देखील टप्प्याटप्प्याने निधी जमा केला जाऊ शकतो.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 3 ते 4 दिवसांत निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, मात्र अंतिम तारीख व प्रत्यक्ष जमा होणे हे शासनाच्या अधिकृत अद्यतनांवर अवलंबून राहील.

लाभार्थींनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत शासन माहिती व बँक खात्याची स्थिती तपासत राहावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या