Digital gaavkari News.
गोंदिया : जिल्ह्यातील हवामानात बदल झाला असून काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार वातावरणात अस्थिरता निर्माण झाल्याने अचानक मेघगर्जना, वीज पडणे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
SEOC मुंबई कडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, आमगाव, सालेकसा, देवरी, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी या तालुक्यांतील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.
वादळी वातावरणाच्या वेळी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली उभे राहणे, तलाव/नदी परिसरात जाणे, तसेच विद्युत उपकरणांचा वापर काळजीपूर्वक करावा. शेतकरी बांधवांनीही हवामानाचा अंदाज घेऊन शेतीची कामे करावीत.
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान बदलामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावे.

0 टिप्पण्या