लाडकी बहीण योजना : ई-केवायसी पोर्टल आजपासून सुरू, 31 मार्चपर्यंत संधी.Ladki Bahin Yojna New Kyc Start 2026.


Digital Gavkari news 

Ladki bahin Yojana Kyc :  राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचे ई-केवायसी पोर्टल आजपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्यामुळे अनेक लाभार्थी महिलांचे योजनेचे पैसे अडकले होते.

राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने अधिकृत आदेश काढत ई-केवायसी पोर्टल पुन्हा सुरू केले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे.

पैसे थांबण्यामागचं कारण काय?

गेल्या काही दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे अनेक लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नव्हता. पोर्टल बंद असल्याने ई-केवायसी करणे शक्य नव्हते आणि त्यामुळे लाभ थांबवण्यात आला होता.

31 मार्चपर्यंत ई-केवायसी करण्याची संधी


महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, आता 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी करता येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रलंबित आहे, त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू होणार

ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी महिलांचे थांबलेले पैसे लवकरच त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे योजनेचा नियमित लाभ पुन्हा सुरू होणार आहे.

लाडक्या बहिणींना महत्त्वाचं आवाहन

ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी अधिकृत पोर्टल किंवा नजीकच्या सेवा केंद्रावर जाऊन 31 मार्चपूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी, अन्यथा योजनेचा लाभ थांबू शकतो.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या