दुर्गाप्रसाद घरतकर
अर्जुनी मोरगाव : २६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिनानिमित्त अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयात शालेय विद्यार्थ्यांच्या आयोजित कार्यक्रमाच्या वेळी राजे ग्रुप अर्जुनी मोरगाव यांच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ शाळेतील विद्यार्थ्यांसह उपस्थित नागरिकांनी घेतला.
राष्ट्रीय सणाचे औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रम राबवण्याची परंपरा राजे ग्रुपने जपली असून, अनेक वर्षांपासून असे सामाजिक हिताचे कार्य सातत्याने यांच्या राजे ग्रुप कडून करण्यात येत आहेत. कार्यक्रमस्थळी शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाची संपूर्ण व्यवस्था या राजे ग्रुप अर्जुनी मोरगाव चे सदस्य कार्यकर्त चेतन कोरे, प्रजय कोरे, अतुल बन्सोड, स्वपनील वाढई, छत्रपाल कापगते, दिपांशू चुटे, स्वपनील खंडाईत, भागवत बिजेलवार, शशांक जायसवाल, शिवम हर्षे तसेच राजे ग्रुपचे सर्व कार्यकर्ते यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आली. सर्व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.
या उपक्रमामुळे सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला असून उपस्थित नागरिकांनी राजे ग्रुपच्या या उपक्रमाचे कौतुक केले.


0 टिप्पण्या