गोंदिया | प्रतिनिधी
Gondia Tiger boy attack ; गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढलेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे, रायगडनंतर आता गोंदिया जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खडकी गावात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास हिरांश शिवशंकर रहांगडाले (वय ४) हा आपल्या आई-वडिलांसोबत घराच्या मागील बाजूस चुलीजवळ बसला होता. याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत हिरांशला आई-वडिलांच्या डोळ्यादेखत उचलून नेले.
गावकऱ्यांचा पाठलाग, पण तोपर्यंत उशीर
घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी आरडाओरडा करत बिबट्याच्या मागे धाव घेतली. लोकांच्या ओरडण्यामुळे बिबट्याने काही अंतरावर मुलाला रस्त्यावर सोडून दिले. मात्र तोपर्यंत चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना पाहायला मिळत आहे.
आई-वडिलांचा आक्रोश, गाव हळहळले
चार वर्षांच्या मुलाचा डोळ्यादेखत जीव गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिरांशच्या आई-वडिलांचा काळीज पिळवटणारा आक्रोश पाहून गावकरीही हळहळ व्यक्त करत आहेत. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण असून पालकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
प्रशासनाविरोधात संताप
या घटनेनंतर नागरिकांनी वनविभाग आणि प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. बिबट्याचा वाढता वावर असूनही योग्य उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची आणि गावात सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

0 टिप्पण्या