गोंदिया सडक अर्जुनी: वडिलांचा मुलींवर लैंगिक अत्याचार पीडित मुलीनं दिले एका बाळाला जन्म .


डिजिटल गावकरी न्यूज

Sadak Arjuni News : मालेगावमध्ये चिमुकली वरती जो अत्याचार झाला तिची हत्या करण्यात आली या संपूर्ण प्रकरणानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचा आपल्याला पाहायला मिळालं मात्र अजूनही हे जे सत्र आहे ते थांबायचं नाव घेत नाहीये समाजात राहत असताना आता नेमका विश्वास ठेवायचा तरी कुणावरती असा प्रश्न महाराष्ट्रामध्ये उपस्थित झालाय.

मालेगावच प्रकरण ताज असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. डुगीपार पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे. एका वडिलांनी स्वतःच्या 14 वर्षीय मुलीच लैंगिक शोषण करत गर्भवती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे.

डुगीपार पोलीस स्टेशन मध्ये आरोपी बापावर लैंगिक बाल शोषण प्रतिबंधक कायद्यां गंभीर गुन्हात दाखल करण्यात आलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीची पत्नी अंदाजे 10 वर्षापासून माहेरी राहत असून आरोपीसोबत घरात मुलगी, मुलगा आणि त्याची आई राहत होती. मुलगी लहान असल्यान वडिलांसोबतच झोपत होती आणि याच निरागस विश्वासाचा फायदा घेत आरोपी बापान विकृतपणे तिच्यावरती अत्याचार केला. काही महिन्यांपासून पोटात अस्वस्थता जाणवल्यानंतर मुलीला गोंदियातील महिला रुग्णालयात नेण्यात आलं. तपासणी दरम्यान मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक खुलासा झालेला आहे. यानंतर पोलिसात तात्काळ गुन्हा नोंदवण्यात आलेला असून आरोपी बापाला पोलिसांनी अटक केलेली आहे. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी असणार कृत्य बापान केलेला आहे याप्रकरणी लगेच पोलिसांनी आरोपी बापाला अटक केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या