डिजिटल गावकरी न्यूज
Durgaprasad Gharatkar
नमस्कार मंडळी, गेल्या काही वर्षांपासून अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या आणि विविध विभागातील लिपिकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला आहे. लवकरच सुमारे 10,000 बेरोजगारांना एकाचवेळी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते सबंधित जिल्हयातील पात्र उमेदवारांना नोकरीचे पत्र देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
वारसाला विभागत नोकरी मिळणार.
शासकीय अथवा निमशासकीय संस्थेतील एखाद्या कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन झाले तर त्यांच्या वारसाला त्याच विभागात नोकरी देण्याचे अनुकंपा तत्वावरील नोकरीचे धोरण राज्यात सन 1976 पासून राबविले जात आहे. या धोरणानुसार गट क आणि ड कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी ही अनुकंपा तत्वावरील नोकरीची सवलत आहे.
तब्बल 9 हजार 658 उमेदवार नोकरीच्या प्रतिक्षेत
राज्यात गेल्या काही वर्षांपासून अनुकंपा नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे तब्बल 9 हजार 658 उमेदवार नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक उमेदवार खालील जिल्ह्यातील आहेत
नांदेड जिल्ह्यातील : 506 उमेदवार
पुणे जिल्ह्यातील : 348 उमेदवार
गडचिरोलीमधील : 322 उमेदवार
नागपूर जिल्ह्यातील : 320 उमेदवार
विविध विभागांमध्ये सर्व जागा भरणार
राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये अनुकंपा तत्वावरील रखडलेली नियुक्ती पूर्ण करणार आहे
महापालिका : 5 हजार 228
नगरपालिका : 725
जिल्हा परिषद : 3 हजार 705
या सर्व जागा भरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या 17 जुलैच्या बैठकीत घेण्यात आला होता.
या निर्णयानुसार सध्याच्या प्रक्रियेत सुधारणा करुन अनुकंपा नोकरीसाठी मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नोकरीसाठी एक वर्षात अर्ज करण्याचे बंधन वाढवून तीन वर्ष पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

0 टिप्पण्या