लाखनी न्यूज : इलेक्ट्रिक डीपीवर अडकलेल्या मांजराला जीवनदान .


डिजिटल गावकरी न्यूज 

लाखनी :-देव तारी त्याला कोण मारी अशी एक मराठी म्हण आहे. या म्हणीचे प्रत्यन्तर लाखनी येथील शिवनगरी ले आऊटमध्ये आला. डीपी वरील जिवंत तारांशी स्पर्श आल्याने मृत्युच्या दारात अडकलेल्या मांजराला जीवनदान देण्यात यश आले. 27 जानेवारीला दुपारी 3 वाजताच्या सुमारास लाखनी येथील शिवनगरी ले आऊट येथील शिवस्मारक परिसरात ही घटना घडली.परिसरातील मोकाट कुत्र्यांनी मांजराचा पाठलाग केला. जीव वाचविण्यासाठी मांजर चक्क इलेक्ट्रिक डीपीवर चढली. कुत्र्यांपासूनन सुरक्षित अंतर रहावे म्हणून मांजर अजून वर चढली. तिचा संपर्क जिवंत तारांशी आल्याने ती तारांना चिपकली. स्पर्किंग च्या आवाजाने प्रा. उमेश सिंगनजुडे आणि वनरक्षक सुधीर कुंभरे घराबाहेर आले. डीपीच्या सभोवती कुत्रे जमलेली होती वर एक मांजर अडकलेली दिसली. क्षणाचाही मागचा पुढचा विचार न करता दोघांनीही मांजरीला वाचवान्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले. बांबूच्या काठीच्या साह्याने मांजरीला जिवंत तारा पासून वेगळे करण्यात त्यांना यश आले.जिवंत इलेक्ट्रिक तारांशी मांजरीचा स्पर्श झाल्याने मांजरीचे पाय आणि तोंड काही प्रमाणात जळल्याने मांजर बेशुद्ध झाली. वनरक्षक कुंभरे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून मेडिकल स्टोर्स मधून औषधी आणली. अवंती सिंगनजुडेच्या साह्याने मांजरीला दुधातून औषध पाजण्यात आले. अखेर काही वेळानंतर बेशुद्ध मांजर शुद्धीवर आली. तीचे पाय जळल्याने तिला बसण्यात आणि उभी होण्यास अडचन होत होती. म्हणून रात्रभर तिला घरीच ठेऊन तिच्यावर औषध उपचार करण्यात आला. अखेर सकाळी ती चालायला लागल्याने तिला सोडून देण्यात आले. जिवंत इलेक्ट्रिक तारामधून मांजरीला बाहेर काढून तिला जीवनदान मिळाल्याने आपण एका मुक्या प्राण्याचे जीव वाचविल्याचे समाधान मांजरीला वाचविण्यात सहकार्य करणारे प्रा. उमेश सिंगनजुडे, वनरक्षक सुधीर कुंभरे व त्यांना मदत करणारे अवंती सिंगनजुडे व अर्णव सिंगनजुडे यांच्या चेहऱ्यावर दिसून आले.म्हणून म्हणतात इन्साये लाख चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजुरे खुदा होता है याचा प्रत्यय याची देही याची डोळा आला. =मुक्या प्राण्याचे संरक्षण करणे व त्याना वाचविणे हे आमचे कर्तव्य आहे. असे मुके प्राणी अडचणीत असल्यास माणुसकीचा धर्म म्हणून त्यांना वाचवावे =वनरक्षक सुधीर कुंभरे =शिवस्मारक परिसरात असलेल्या डीपी चे दरवाजे नेहमी उघडे असतात. या परिसरात लहान मुले खेळत असतात. मांजराप्रमाणे धोका होण्याची शक्यता नाकरता येत नाही. विदयुत विभागाने याकडे लक्ष द्यावे.=प्रा. उमेश सिंगनजुडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या