सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे : मुरलीधर नंदूरकर.


Digital Gaavkari News 

पालांदूर/चौ


मित्रांनो वर्गात केवळ अध्यापनाचे काम केले जाते,मात्र स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करून दिले जाते.त्यामुळे शाळेतील प्रत्येक विद्यार्थांनी आपल्या आवडीनुसार आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन से.नि.शिक्षक मुरलीधर नांदुरकर यांनी कार्यक्रमाचे बक्षीस वितरण व नाफिजबानो शेख यांच्या सेवावृत्ती सत्कार कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अंबादास धकाते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीधर नांदुरकर , सत्कारमूर्ती नाफिजबानो शेख, कॉन्व्हेन्ट विभाग प्रमुख इंदिरा जांभूळकर व वैशाली शिवणकर उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांनी सुंदर कलाप्रदर्शनी भरवली होती.यामध्ये संविधान निर्मितीला 75 वर्ष झाल्याने डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित फोटोची प्रदर्शनी , त्याबरोबर नागपूर येथील दिक्षा भुमीची प्रतिकृती निर्माण केली होती.

कार्यक्रमा दरम्यान बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खाद्य पदार्थांची दुकाने लावली होती.यातून विद्यार्थ्यांना खरेदी विक्री, देवाणघेवाण, आकडेमोड व नफा तोटा यांची संकल्पना मिळाली.सांस्कृतिक व शारीरिक स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्याहस्ते बक्षीस देण्यात आले.

शाळेतील शिक्षीका नाफिजबानो शेख ह्या सेवानिवृत्त झाल्याने विद्यालयातर्फे त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी कांबळे तर आभार प्रदर्शन किशोर खंडाईत यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर खंडाईत, ज्ञानेश्वर लुटे, अश्विनी कांबळे, मंजुषा नांदुरकर, जयदेव मेश्राम, वैशाली शिवणकर, इंदिरा जांभूळकर व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहभाग घेतला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या