देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, विविध शाळा सहभागी,एकतेचा संदेश
पालांदूर/चौ.येथील समाज मंदिराच्या पटांगणावर प्रजासत्ताकदिनी ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन,व नायब तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
विविध सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचा परिचय करून दिला.
स्थानिक गोविंद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, जिल्हा परिषद कनिष्ठ कला महाविद्यालय, सरस्वती विद्यालय, संताजी महाविद्यालय, गोविंद प्राथमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, गोविंद कॉन्व्हेन्ट, जिल्हा परिषद कॉन्व्हेन्ट तसेच अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लताताई कापसे होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.प्रदिप दहिकर, प्राचार्य गोवर्धन शेंडे, प्राचार्य तरोणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश बंन्सोड, मुख्याध्यापक सविता खंडाईत, मुख्याध्यापक आसिफ अली सय्यद, मुख्याध्यापक अंबादास धकाते, उपसरपंच पंकज रामटेके,कवलेवाडा ग्रामपंचायत सरपंच मनिषा खंडाईत, जिल्हा परिषद सदस्य सरिता कापसे,माजी जिल्हा परिषद सदस्य दामाजी खंडाईत,तु.रा.भुसारी,प्रतिभा,सेलोकर, बिंदू कोचे, विजय कापसे,तं.मु.अध्यक्ष मस्के,व हेमराज कापसे, उपस्थित होते.
प्रथम जवाहरनगर येथील आयध निर्माणीत स्फोटात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.संविधानाचे वाचण करण्यात आले.सरपंच यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.आदर्श शेतकरी स्वप्नील नंदनवार , माजी सैनिक नव्याने शासकीय सेवेत रुजू झालेल्या मुला मुलींचा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर सर्व शाळांना प्रसिस्त पत्र देऊन गौरविण्यात आले.
स्काऊट गाईडची मानवंदना
सर्व विद्यालयातील आरएसपीची स्काऊट गाईड्स विद्यार्थींनी व्यासपीठावरी गणमान्य व्यक्तींना मानवंदना दिल्या. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व शारीरिक प्रात्यक्षिके करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक संजय निंबेकर,तर आभारप्रदर्शन उपसरपंच पंकज रामटेके यांनी केले.

0 टिप्पण्या