Digital Gaavkari News
भंडारा :- स्थानीय महावितरण भंडारा मंडळ लघु प्रशिक्षण केंद्र भंडारा येथे आयोजित जिल्हयातील सर्व विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यरत आभियंत्यांची सभा आयोजित करण्यात आली. त्या प्रसंगी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश तथा भंडारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव बिजु बी. गवारे उदगारले की,महावितरण कंपनी सर्व स्तरावर विज पुरवठा करणारी कंपनी आहे. ग्राहकांना विज अखंड पने विज पुरवठा करत असते विज आकारणी शुल्क वसूल करण्यात आले तरच कंपनीचे उत्पादन वाढेल पण काही ग्राहक आकारणी शुल्क देण्यास टाळाटाळ करून धमकावत असतील किंवा ईजा किंवा भांडण करू पहात असतील तर कायदेशीर मार्गाने कार्यवाही करावे असे मार्गदर्शन केले.तर अधिक्षक अभियंता कैलाश गिरी म्हणाले की, महावितरण कंपनीच्या उत्पन्न वाढीसाठी शुल्क वसुली नियोजन आवश्यक आहे, तर कार्यकारी अभियंता सौ. प्रिती फुले म्हणाल्या आकारणी शुल्क वसुली करतांना अडचणी येतातच सामंजस्याने वसुली साठी प्रयत्न करावे पण तोडगा निघत नसेल तरच कायदेशीर कार्यवाही करावे लागेल असा विचार व्यक्त केला.
या लघु प्रक्षिशण केंद्र भंडारा येथे वीज चोरी चे कायदे , वीज वितरण कंपनी मध्ये महसूल कसा वाढवता येईल तसेच विद्युत कायदा कसा अंबालबजावणीत आणता येईल म्हणुन प्रमुख पाहुणे म्हणुन बीजू बा. गवारे यांच्याशी ह्या बाबद् विस्तृत विचार मंथन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिक्षक अभियंता कैलाश गिरी, पकार्यकारी अभियंता (प्रशासकीय) प्रिती फुले, मंडळ चे विधी अधिकारी ऍड.राहुल खंडारे , मंडळ अभियंता गजभिये, लघु प्रक्षिशण केंद्रिय समन्वयक उपकार्यकारी अभियंता अभिलाष सोमकुवर प्रामुख्याने उपस्थीत होते.

0 टिप्पण्या