डिजिटल गावकरी
दुर्गाप्रसाद घरतकर
नमस्कार मंडळी थंबनेल बघून तुम्ही कदाचित विचारात पडला असाल इथं आपल्यासारख्यांना आयुष्यभर राब राब राबून आणि काबाड कष्ट करून पण एखाद्या करोडची प्रॉपर्टी जमा करता येत नाही अहो प्रॉपर्टी जमा करणं सोडाच पण या मागायच्या काळात आपल्या कुटुंबाचं पोट भरणं सुद्धा मुश्किल होतंय तिथे एखादा माणूस दिवसाला पाच पन्नास लाख नव्हतं एक दोन कोटी पण नाही तर तब्बल 48 कोटी कमवतोय आता तुम्ही असं म्हणाल काय सांगताय राव चेष्टा करायला तुम्हाला आम्हीच मिळालो काय पण मंडळी चेष्टेचा विषय नाही हो ही गोष्ट खरी आहे हा विश्वास बसणं जरा कठीण आहे पण हे खरं आहे आणि हा कारनामा करून दाखवलाय भारतीय वंशाच्या जगदीप सिंग यांनी पण भारतीय वंशाचे जगदीप सिंग हे त्यांच्या क्वांटमस्केप या कंपनीचे सीईओ असून सीईओ असताना त्यांचा पगार आहे तब्बल 17500 कोटी रुपये म्हणजेच दिवसाला तब्बल 48 कोटी रुपये मंडळी अगदी तळागाळातून सुरुवात करून जगाचे वेगवेगळे अनुभव घेतल्यानंतर आपली कंपनी स्थापन करून अमेरिकेत तिचं मोठं नाव तयार करून आज जगात सर्वाधिक पगार घेण्याचा विक्रम करणाऱ्या जगदीप सिंग यांचा आजपर्यंतचा हा जबरदस्त प्रवास कसा होता याबद्दलच आपण आजच्या या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत.
नमस्कार मी दुर्गाप्रसाद घरतकर मंडळी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एखाद्या कंपनीत सगळ्यात जास्त पगार हा
त्या कंपनीच्या सीईओ ला असतो त्यामुळे जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सीईओची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा गुगल चे सुंदर पिचाई मायक्रोसॉफ्ट चे सत्या नडेला ॲड चे शंतनू नारायण आधी सगळ्यांची नाव समोर येतात आता त्या सगळ्यांनाच जगदीप सिंग या भारतीय अंशाच्या क्वांटमस्केप या कंपनीच्या सीओ नी खूप मागे टाकलाय आता आपल्याला जर तुलनाच करायची झाली तर गुगल चे सीईओ सुंदर पिशाई यांना विविध भत्त्यांसह वार्षिक 1854 कोटी इतका पगार मिळतो म्हणजेच दिवसाला साधारण पाच कोटी रुपये पण तिथे जगदीप सिंग यांना दिवसाला तब्बल 48 कोटी रुपये पगार मिळतो म्हणजेच तिचा यांच्यापेक्षा दहा पटीने जास्त इतका भरमसाठ पगार जगदीप सिंग यांना कसा मिळतो याबद्दल आता आपण थोडक्यात माहिती घेऊया .
मंडळी जगदीप हे भारतीय वंशाचे असून त्यांचा जन्म दिल्लीमध्ये झाला असं विकिपीडियावर असलेल्या माहितीनुसार समजतं दरम्यान जगदीप यांनी स्टॅनफोर्ड
विद्यापीठातून बीटेक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठामधून एमबीए पूर्ण केलंय शिवाय क्वांटमस्केप या आपल्या कंपनीची स्थापना करण्यापूर्वी त्यांनी 10 वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं होतं 10 वर्ष वेगवेगळ्या कंपनीत काम करताना त्यांनी आपलं नॉलेज वाढवलं आणि 2010 मध्ये क्वांटमस्केप आपली कंपनी स्थापन केली म्हणजे ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी सॉलिड स्टेट बॅटरी बनवते त्यांच्या बॅटरीने इलेक्ट्रॉनिक वेहीकल्स उद्योगात जबरदस्त क्रांती घडवून आणल्याचं सांगण्यात येतं चार्जिंगचा वेळ कमी करणं आणि कार्यक्षमता वाढवणे ही त्यांच्या बॅटरीची सर्वात मोठी वैशिष्ट्ये आहेत असं समजतंय दरम्यान यामुळे त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली शिवाय क्वांटमस्केप ने 2012 मध्ये वर्ल्ड्स वॅगन सोबत पार्टनरशिप केली त्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळाली तसेच 2020 मध्ये क्वांटमस्केप न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज वर म्हणजेच अमेरिकेच्या स्टॉक एक्सचेंज वर आली आणि इथून कंपनीला जागतिक गुंतवणूक उदाहरण मोठा पाठिंबा मिळालेला दिसून आला त्यामुळे कंपनीचं व्हॅल्यूएशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं त्यामुळेच कंपनीतील सगळ्याच कर्मचाऱ्यांचं आणि सीईओं पेमेंट मोठ्या प्रमाणात वाढलं म्हणजे कंपनीचं व्हॅल्यूएशन वाढल्यानंतर सीईओ जगदीप यांच्या पगारांमध्ये प्रचंड वाढ होऊन त्यांचा वार्षिक पगार तब्बल 17500 कोटी रुपये इतका झाला पगारामध्ये कंपनीमध्ये त्यांच्या नावावर असलेल्या दोन पूर्णांक तीन अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या शेअर्सचाही समावेश आहे दरम्यान इतक्या प्रचंड पगारामुळे जगदीप हे आजपर्यंतचे जगात तील सर्वात जास्त पगार घेणारे व्यक्ती ठरले आहेत.
दरम्यान फेब्रुवारी 2024 मध्ये जगदीप यांनी क्वांटमस्केपच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आणि कंपनीची जबाबदारी शिवा शिवराम यांच्याकडे सोपवली मंडळी सध्या जगदीप यांनी आपला नवीन प्रवास चालू केला असून सध्या ते एका स्टेल्थ स्टार्टअपचे सीईओ आहेत आणि भविष्यातील टेक्नॉलॉजीवर म्हणजेच एआय वर काम करत असल्याचं समजतंय दरम्यान त्यांच्या नव्या स्टार्टअप मध्ये नक्की काय आहे हे अजूनही गुपितच आहे पण त्यांचं भूतकाळातील काम आणि दूरदृष्टी पाहता यावेळी ते काहीतरी भव्य दिव्य करतील अशी अमेरिकन इंडस्ट्री सर्कल मध्ये सध्या चर्चा चालू असल्याची दिसून येत आहे मंडळी विविध कंपन्यांमध्ये काम करून त्यानंतर आपली कंपनी स्थापन करून अल्पावधीतच संपूर्ण जगामध्ये कंपनीचा दबदबा निर्माण करून आजपर्यंत जगात सर्वाधिक पगार घेणाऱ्या एलॉन मस्क सध्या नडेला आणि सुंदर पिचाई यांसारख्या दिग्गज सीओंना एका झटक्यात मागे टाकून जगभरात सर्वाधिक पगार घेण्याचा विक्रम करून जगदीप सिंग यांनी स्वतःला सिंग इज किंग हेच सिद्ध केलं असल्याची भावना आता सध्या तमाम भारतीय व्यक्त करताना दिसतात पण आपल्या बुद्धीच्या कौशल्याला जर मेहनतीची जोड दिली तर जगात काहीही अशक्य नाही हेच जगदीप यांनी आपल्याला दाखवून दिलं असून त्यांचा प्रवास सगळ्या जगालाच प्रेरणादायी असा आहे मंडळी जगदीप यांच्या असामान्य प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

0 टिप्पण्या