तरुणांनो ध्येय निश्चित करा -प्रा. उमेश सिंगनजुडे.



नरेंद्र मेश्राम


भंडारा :-जीवनात यशस्वी व्हायचं असेल आणि भविष्यात तुम्हांला जे हवं ते मिळावं असं वाटत असेल तर तरुणांनी आताच आपलं ध्येय निश्चित करावं असं मत प्रा. उमेश सिंगनजुडे यांनी मांडले ते राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात मार्गदर्शक बोलत होते.

संताजी कला महाविद्यालय पालांदूरचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर गुरढा येथे आयोजित करण्यात आले. या शिबिरात बोद्धिक कार्यक्रमातर्गत सांस्कृतिक कार्यक्रमातून व्यक्तिमत्व विकास यावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. चर्चा सत्राचे अध्यक्ष संताजी महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रमेश बागडे, प्रमुख मार्गदर्शक समर्थ महाविद्यालय लाखनीचे मराठी विभाग प्रमुख डॉ. बंडु चौधरी, मनोहर कनिष्ठ महाविद्यालय गुरढाचे प्रा. उमेश सिंगनजुडे, राष्ट्रीय सेवा योजना नागपूर विभागाचे अधिकारी डॉ. संजय निंबेकर, शिबीर प्रमुख डॉ. राजेंद्र खंडाईत व विकास मेश्राम विचारपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मार्गदर्शक प्रा. सिंगनजुडे म्हणाले, ध्येय प्राप्त करण्यासाठी जिद्द, परिश्रम, वेळेचे नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन, अपयश पचवीण्याची क्षमता व आवश्यक कौशल्य विकसित करावी असे मत मांडले.या कार्यक्रमात डॉ. बंडु चौधरी यांनी आपल्या प्रभावी व्यक्तिमत्व विकासासाठी सांस्कृतिक कौशल्य विकसित करावी व स्थानिक कलाकृतीला प्राधान्य द्यावे असे मत मांडले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रमेश बागडे यांनी संवाद कौशल्य विकसित करावीत व आपल्या व्यक्तिमत्वला आकार द्यावा असे मत मांडले.या कार्यक्रमाला शिबिरातील विद्यार्थी आणि गावकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन अहिंशक खोब्रागडे, प्रास्ताविक डॉ. संजय निंबेकर तर आभार प्रा. मोहतुरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या