
डिजिटल गावकरी
नरेंद्र मेश्राम
भंडारा :- समर्थ महाविद्यालय, लाखनीमध्ये महिला उद्योजकता केंद्राच्या अंतर्गत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थिनींना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवणे, विविध कौशल्य प्राप्त करून उत्तम उद्योजिका निर्माण करणे होता.
कार्यशाळेचे आयोजन संयोजिका डॉ. स्मिता गजभिये आणि प्रा. प्रतिभा वंजारी यांनी केले. प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षिका कोमल गेडाम, स्नेहल वाघाडे आणि करिष्मा भुते यांनी विद्यार्थिनींना कार्यक्रमाप्रसंगी वापर होणारा बॅच बिल्ला, नैसर्गिक आणि कृत्रिम पुष्परचना, तसेच कागद आणि कापडांपासून आकर्षक फुलांचे पुष्पगुच्छ तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.
कार्यशाळेला विद्यार्थिनींनी उत्साहात भाग घेतला. प्रियंका सोनकुसरे, चिन्मयी चारमोडे, शुभांगी बेंदवार, शुभांगी बोकडे, सोनल पराते, अंकिता मेश्राम, प्रियंका बोरकर, सुनंदा बागडे, गायत्री पडोळे, प्रज्ञा दिघोरे, खुशी धुर्वे, आणि स्वीटी हरडे या विद्यार्थिनींनी कार्यशाळेतील विविध कार्ये आणि सहाय्यक कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कार्यशाळेचा समारोप विद्यार्थिनींना नव्या कौशल्यांचे ज्ञान मिळाल्याने झाला, ज्यामुळे त्या आपल्या भविष्यात व्यवसाय सुरू करण्यास सज्ज होणार आहेत.
0 टिप्पण्या