मचारना शाळेचे तालुकास्तरीय स्पर्धेत समाधानकारक यश जिल्हास्तरिय स्पर्धेकरिता निवड.


Digital Gaavkari News 
नरेंद्र मेश्राम


भंडारा :- लाखनी तालुक्यातील कोलारी येथे आयोजित तालुकास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मचारना येथील विद्यार्थ्यांनी समाधानकारक यश मिळवले आहे. वैयक्तिक आणि सांघिक गटामध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.

स्पर्धेतील ठळक यश

1. माध्यमिक गट (मुले) खो-खो – उपविजेते पद

2. प्राथमिक गट (रिले धावणे) – तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक

वैयक्तिक यश:

विद्यार्थ्यांनी वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्येही चांगली कामगिरी करत जिल्हास्तरीय फेरीसाठी पात्रता मिळवली आहे.

माध्यमिक गट:

100 मीटर धावणे *जिल्ह्यासाठी पात्र खेळाडू

1. *यश आदेश लांजेवार वर्ग 7 वा

2. *मानव श्यामलाल किण्नाके वर्ग 5 वा

प्राथमिक गट:

100 मीटर धावणे:

जिल्ह्यासाठी पात्र विद्यार्थी – समर्थ सोमेश्वर कुथे वर्ग 3 रा.

या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय फेरीसाठी निवड झाली आहे.

या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक सुभाष काळे सर यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि मेहनत आहे. त्याचबरोबर विजय चेटुले सर, भीष्म लांडगे सर, करुणा मेश्राम मॅडम, आणि गोंधोळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळोवेळी प्रोत्साहन दिले आणि प्रशिक्षण दिले.विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी मोठ्या जिद्दीने तयारी केली होती. त्यांच्या मेहनतीचा योग्य तो सन्मान मिळाला आहे. गावकऱ्यांनी आणि पालकांनी देखील विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक पातळीवर मोठे प्रोत्साहन दिले.

मचारणा जिल्हा परिषद वरिष्ट प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी आहे. या विद्यार्थ्यांनी शाळेचे आणि गावाचे नाव उंचावले आहे. जिल्हास्तरीय फेरीसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या