भंडारा , गोंदिया जिल्हा परिषद माध्यमिक पतसंस्थेकडून धनंजय बिरणवार यांचा सत्कार.


डिजिटल गावकरी न्यूज
नरेंद्र मेश्राम


भंडारा:- भंडारा-गोंदिया जि.प.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सहकारी पत संस्था मर्या मोहाडीच्या वतीने
जिल्हा परीषद जकातदर कन्या विद्यालयातील धनंजय बिरणवार व सूनंदा बिरणवार यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभ सोहळा कार्यक्रम मोहाडी येथील भंडारा गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक सहकारी पतसंस्था मर्यादित मोहाडीच्या सभागृहात व्यवस्थापन मंडळाच्या वतीने आयोजीत करण्यात आले.

या सत्कार समारंभ सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पतसंस्था अध्यक्ष मदन मेश्राम हे होते.तर प्रमुख पाहूणे म्हणून गोंदियाचे मोरेश्वर पटले हे होते तर सत्कारमुर्ती म्हणुन धनंजय बिरनवार हे होते . यावेळी व्यवस्थापक मंडळातील मदन मेश्राम, विजयकुमार बागडकर, मोरेश्वर पटले मारोती मेश्राम, संदीप वहिले, प्रफुल देशमुख, डोलिराम गि-हेपुंजे, देवणाथ लांजेवार,
रविंद्र मेश्राम , अमोल जांभुळे, चरणदास भिवगडे, दिलीपकुमार रहांगडाले, धनराज कवाने नरेश भुरे, सौ. सुनीता ढेंगे, कु.वर्षा.एम. मेश्राम आदी अतिथी गण उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक एस. जी. चींधालोरे,पारधी,तसेच सौ. कांबळे, डी.पी. भालेराव, खोब्रागडे, बोळणे, पाठक, लिल्हारे, नेहाल बिरणवार आदींचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या