लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुडन्यूज! जानेवारी चे खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला आला की नाही?


Digital Gaavkari News
Durgaprasad Gharatkar


Ladki Bahin January Hapta: नमस्कार मंडळी लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे जानेवारीचे १५०० रुपये महिलांना मिळण्यास सुरुवात झाली आहे.

उद्यापर्यंत सर्व लाभार्थी महिलांना पैसे मिळणारं

लाडकी बहीण योजनेचे पैसे काही महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. आणि ज्या महिलांच्या खात्यात पैसे येणे बाकी आहे त्यांच्या खात्यात उद्यापर्यंत (२६ जानेवारीपर्यंत) पैसे दिले जाणार आहे. हप्त्याचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे.

हप्ता जमा झाला की नाही? असं करा चेक


▪️लाडकी बहीण योजनेत हप्ता आल्यावर तुमच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे आले की नाही के समजणार आहे.

▪️त्याचसोबत बँकेच्या मोबाईल अॅपवर जाऊन तुम्ही पैसे आले की नाही हे चेक करु शकतात.

▪️तुम्ही बँकेच्या अधिकृत अॅपवर जाऊन अकाउंट डिटेल्समध्ये जाऊन पैसे आलेत की नाही चेक करु शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या