मुंबई | प्रतिनिधी
दुर्गाप्रसाद घरतकर
मुंबई: नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात आज ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. राजभवन येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाचा नवा गटनेता आणि उपमुख्यमंत्री कोण होणार, याबाबत उत्सुकता होती. अखेर या प्रश्नाचं उत्तर सुनेत्रा पवारांच्या शपथविधीने मिळालं आहे.
राष्ट्रवादीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
शपथविधीपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले.
पहिल्या ठरावानुसार सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली, तर दुसऱ्या ठरावात पक्षाशी संबंधित सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले.
राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा
गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर राजभवन येथे त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला.
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय
सुनेत्रा पवार या आतापर्यंत राज्यसभेच्या खासदार म्हणून कार्यरत होत्या. आज त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाल्याने त्यांच्या नेतृत्वाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हा निर्णय केवळ सत्तासंतुलनापुरता मर्यादित नसून, आगामी काळातील महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे.

0 टिप्पण्या