मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्त व नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज मंगळवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातून तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.
या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्यात दिनांक २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा दुःखवटा जाहीर केला आहे.
याबाबतची अधिकृत माहिती सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांच्यामार्फत देण्यात आली आहे. या कालावधीत राज्यातील ज्या सर्व शासकीय व निमशासकीय इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविला जातो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार आहे.
तसेच या तीन दिवसांच्या दुःखवट्याच्या काळात कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद राहतील, असेही शासनाने कळविले आहे.
अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्यांना राज्य सरकारकडून मानाचा मुजरा अर्पण करण्यात येईल. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक अनुभवी, प्रभावी आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले असून सर्व स्तरातून त्यांच्या कार्याची आठवण काढत श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

0 टिप्पण्या