![]() |
Pm kisaan 20 va Hapta |
PM Kisan Sanmaan Nidhi 20 va Hapta : नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी! शेतकरी वर्गासाठी मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ ऑगस्ट २०२५ रोजी वाराणसी येथून PM किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता वितरित होणार आहे. सुमारे ९.७ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल ₹२०,५०० कोटी रक्कम थेट जमा होणार आहे.
२ ऑगस्ट २०२५: हप्त्याचा थेट ट्रान्सफरचा दिवस
पीएम-किसान योजनेची २०वी हप्त्याची रक्कम पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते थेट DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ₹२००० इतकी रक्कम मिळणार असून, हप्त्याचे एकूण मूल्य ₹२०,५०० कोटी रुपये एवढं आहे.
योजना सुरू होऊन ३.६९ लाख कोटींपर्यंत मदत
२०१९ पासून सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत १९ हप्त्यांमधून ₹३.६९ लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम देशभरातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. ही योजना शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६००० (तीन हप्त्यांमध्ये) देण्याची हमी देते.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही २०वा हप्ता?
योजनेत काही अटी अनिवार्य केल्या आहेत. खालील अटी पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही:
ई-केवायसी पूर्ण न केलेले शेतकरी
आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक न केलेले शेतकरी
सरकारी नोकर, करदाते, मोठे जमीनदार किंवा अपात्र लाभार्थी
यामुळे, शेतकऱ्यांनी लवकरात लवकर eKYC पूर्ण करून घेणे अत्यावश्यक आहे.
अपात्र शेतकऱ्यांकडून होणार पैसे वसूल
शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, सुमारे ₹४१६ कोटींच्या अपात्र लाभ वसूल करण्यात आले आहेत. अशा शेतकऱ्यांनी चुकीने घेतलेल्या रकमा परत कराव्या लागतील. ही वसुली राज्य व केंद्रशासित प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे.
डिजिटल यंत्रणा अधिक मजबूत
योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी केंद्र सरकारने पुढील तंत्रज्ञानाशी एकत्रीकरण केलं आहे:
PFMS – बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर
UIDAI – आधार पडताळणी
IT विभाग – करदात्यांची यादी मिळवणे
eKYC प्रणाली – स्वत: मोबाईलवरूनच अपडेट करणे
राज्यात मोहीम राबवण्यात येणार
देशभरातील ७३१ कृषी विज्ञान केंद्रं, १००+ संशोधन संस्था आणि ग्रामपंचायती यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे.
‘कृषी सखी’, ‘बँक सखी’, ‘ड्रोन दीदी’, ‘पशू सखी’, ‘बीमा सखी’ यांच्यामार्फतही माहिती पोहोचवली जाईल.
PM किसान योजनेचा लाभ कसा घ्याल?
👉 pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा
👉 Farmers Corner > e-KYC विभागात जा
👉 तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल OTP द्वारे केवायसी पूर्ण करा
👉 हप्ता तुमच्या खात्यावर येतोय की नाही हे “Beneficiary Status” मध्ये पाहा
जर तुम्ही पात्र असाल आणि अजूनही eKYC केली नसेल, तर लगेच करा. नाहीतर यंदाचा ₹२००० चा हप्ता चुकू शकतो.
0 टिप्पण्या