बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2025 : विहिरीसाठी मिळणार थेट ४ लाख रुपयांचे अनुदान, अर्ज सुरू.

Birsa munda krushi Kranti Yojana scheme

Birsa Munda Krushi Kranti Yojana : नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी! शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे! अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठा आधार देणारी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2025 सध्या सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत नवीन विहीर खोदकामासाठी थेट ४ लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेविषयी सविस्तर माहिती आणि या योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागतात ते जाणून घेऊ.

या योजनेअंतर्गत कोणकोणत्या गोष्टीसाठी किती अनुदान मिळेल?

कामाचे नाव.                          अनुदानाची रक्कम

नवीन विहीर खोदकाम                ₹4,00,000
जुनी विहीर दुरुस्ती                     ₹1,00,000
शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण      ₹2,00,000
वीज जोडणी पंपसेटसाठी              ₹20,000
ठिबक सिंचन संच                         ₹97,000
डिझेल पंप                                 ₹40,000
पीव्हीसी पाईप.                              ₹50,000
परसबाग योजना                              ₹5,000

अर्ज कसा करावा ?

महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करा:
https://mahadbt.maharashtra.gov.in

शेती विभागामध्ये जा आणि "बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना" निवडा

आपली पात्रता तपासा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज सादर करा आणि मिळालेल्या अर्ज क्रमांकाची नोंद ठेवा.

पात्रता काय आहे?

अर्जदार हा अनुसूचित जमातीचा असावा.

अर्जदाराकडे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

विहिरीसाठी किमान ४० गुंठे जमीन, इतर घटकांसाठी २० गुंठे जमीन असणे गरजेचे.

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ₹1.50 लाखांपेक्षा कमी असावे.

अर्जदाराने यापूर्वी योजना घेतली नसावी – ५ वर्षात पुन्हा लाभ मिळत नाही.

लागणारी कागदपत्रे

जात प्रमाणपत्र

7/12 आणि 8 अ उतारा

उत्पन्न प्रमाणपत्र

₹५०० च्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र

तलाठी दाखला

आधार कार्ड, बँक पासबुक

तुम्ही जर अनुसूचित जमातीचे शेतकरी असाल आणि तुमच्याकडे योग्य जमीन व कागदपत्रे असतील, तर ही योजना तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. ४ लाख रुपये विहिरीसाठी आणि इतर प्रकल्पासाठी भरघोस अनुदान घेण्यासाठी आजच अर्ज करा आणि शेतीला चालना द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या