नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा फटका; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट.

नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा फटका; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

Nagpur Bhandara Rain News:
नागपूर : नुकताच पावसाळा सुरु झाल्यानंतर विदर्भात पुन्हा एकदा मान्सूनने जोर धरला असून नागपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असून, नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मंगळवारी सकाळपासूनच या भागात आकाश ढगाळ असून काही भागांमध्ये जोरदार सरी सुरू झाल्या आहेत. दिवसभरात थंड वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पानी हा दिवसभर सुरू असल्याने पाणी कमी होण्याची शक्यता नाही आहे असे हवामान खात्याने वर्तवले आहे.

शहरांमध्ये काय परिस्थिती?

नागपूर शहरातील झोपडपट्टी भाग, कोराडी रोड, मनिषनगर, हुडकेश्वर परिसरात पाणी साचण्याची शक्यता

भंडारा शहरात व गोंदियाच्या बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडी होण्याचा इशारा

महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनांकडून नाले व पाणी निचरा यंत्रणा साफ करण्याचे काम सुरू

शेतकऱ्यांसाठी खबरदारी

जून महिन्यात पेरण्या खोळंबल्या होत्या. आता पावसामुळे शेतीला चालना मिळणार असली तरी,

बियाणं टाकताना सतत पावसाचा अंदाज पाहून टाका
पाण्याचा निचरा होणं अत्यंत गरजेचं, अन्यथा पिकं कुजण्याचा धोका

प्रशासनाकडून सूचना

जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना अर्धवट सुट्टी देण्याचा विचार सुरू आहे.
आपत्ती व्यवस्थापन दल सज्ज आहे.
कुठेही अडकल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

शक्य असल्यास घरातच थांबा, अनावश्यक प्रवास टाळा

मोबाईलमध्ये हवामान ॲप चालू ठेवा, अपडेट्स पाहत राहा

झोपडपट्टी, नाल्यांच्या आजूबाजूच्या भागात राहणाऱ्यांनी सतर्क राहावं

इलेक्ट्रिक वायर, झाडं, फाटलेले खांब यांच्याजवळ जाऊ नये

मान्सून हाच महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सण आहे – पण तो साजरा करताना खबरदारी हीच खरी सुरक्षा!
पावसात मनसोक्त भिजा, पण सुरक्षिततेच्या मर्यादेतच राहून पावसाचा आनंद घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या