नागपूरच्या रस्त्यावरून चक्क मनपाचा बेंच चोरीला; दांपत्याचा व्हिडिओ व्हायरल!



नागपूर | प्रतिनिधी

Nagpur News Today: समाजामध्ये काही प्रवृत्ती अशाही असतात की, लोकांच्या भल्यासाठी केलेल्या गोष्टी त्यांना पाहवतच नाहीत. नागपूर शहरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेची सध्या शहरभर चर्चा सुरू आहे.

काय घडलं नेमकं?

नागपूर महिला पोलीस प्रशिक्षण केंद्र म्हणजेच RPTC-PTS जवळून माटे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नागपूर महानगरपालिकेने बसवलेला एक बाक (बेंच) चक्क एका दांपत्याने चोरी करून नेल्याची घटना घडली आहे.

या बाकाचे स्क्रू कदाचित आधीच सैल झाले असावेत. स्थानिक नागरिकांच्या मते, या दांपत्याची नजर आधीपासूनच या बाकावर होती.

चक्क दुचाकीवरून बाक घेऊन गेले!

काल दुपारी, जेव्हा रस्ता पूर्णपणे निर्जन होता, तेव्हा हे दांपत्य दुचाकीवरून आले आणि पाहता पाहता बाक उचलून नेतानाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागपूर शहरात सर्वत्र त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर संताp

हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरतो आहे. नागपूरकर नागरिकांमध्ये संतापाची लाट असून अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

"लोकांच्या वापरासाठी ठेवलेल्या गोष्टी जर अशीच चोरी होत राहिल्या, तर शहराचा विकास कसा होणार?" असा प्रश्न अनेक नागरिक विचारत आहेत.

पोलिसांकडून चौकशी सुरू

पोलिस प्रशासनाने व्हिडिओची दखल घेतली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दांपत्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. लवकरच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

ही घटना केवळ एक बाक चोरीची नसून, समाजाच्या मानसिकतेचा आरसा आहे. सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे, असे प्रत्येकाने समजून वागायला हवे. अन्यथा, अशा प्रवृत्तींना उत्तेजन मिळतच राहील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या