नागपूर: नमस्कार मंडळी, पावसाला सुरुवात झाली असुन शेतकऱ्यांनी धान पेरणी सुरु केली आहे आणि आपल्या विदर्भातील खरीप हंगामात सर्वाधिक लागवड केली जाणारी पिकं म्हणजे धान. परंतु या धान पिकांमध्ये सर्वाधिक उत्पादन देणारा धान कोणता, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात असतो. अनेक शेतकरी प्रत्येक वर्षी नविन बिजाई घेउन पेरणी करतात पण कृषी तज्ज्ञांच्या मते, विदर्भासाठी सध्या सर्वाधिक उपयुक्त व उत्पादनक्षम देणारा धान म्हणजे ‘RMT-701’ हा आहे या धाणामुळे विदर्भात शेतकऱ्यांना चांगला उत्पादन मिळालेला आहे.
‘RMT-701’ ला विदर्भात शेतकऱ्यांचा प्रतिसाद
शेतकरी मित्रांनो विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांमध्ये RMT-701 धाणाचा विशेष प्रसार झाला आहे अनेक वर्षापासून हा धान विदर्भात लावला जातो . या धाणाचे वैशिष्ट्य म्हणजे कमी कालावधीत अधिक उत्पादन मिळवण्याची क्षमता असते .
कृषी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा धान 120 ते 125 दिवसांत पीक तयार करतो, तसेच 50 ते 65 क्विंटल प्रति हेक्टर इतकं उत्पादन देतो, जे विदर्भातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत खूप अधिक आहे.
RMT-701’ धांनाला कमी पाणी, अधिक उत्पादन
विदर्भातील बहुतांश शेती कोरडवाहू व पावसावर आधारित आहे. अशा परिस्थितीत कमी पाण्यावर टिकणाऱ्या धाणांची गरज असते. RMT-701 ल पानी कमी लागतो आणि म्हणुन हा धान विदर्भातील शेतकऱ्यांचा पहिला पर्याय ठरत आहे.
रोगप्रतिकारक आणि चविष्ट धान्य
या धानाला ब्लास्ट, शीथ ब्लाइट, ब्राऊन स्पॉट यांसारख्या आजारांपासून नैसर्गिक प्रतिकारशक्ती आहे. त्याचबरोबर हया धान्यापासून तयार होणारा भात चविष्ट असून बाजारातही याला चांगला दर मिळतो, असे स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
शेती तज्ज्ञांचा सल्ला
“विदर्भात खरीप हंगामात RMT-701 सारखे धान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतात. योग्य खत व्यवस्थापन, सिंचन आणि पीक संरक्षण पद्धतींचा वापर केल्यास उत्पन्नात मोठी वाढ होते,” असे मत कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉ. गणेश मेश्राम यांनी व्यक्त केले.
RMT 701 बी-बियाणं कुठे मिळेल?
ह्या धानाचे बीज कृषी सेवा केंद्रे तसेच शासकीय कृषी कार्यालयांमार्फत या धानाची विक्री केलि जाते . शिवाय ऑनलाईन पोर्टल्सवरही (Agrostar, DeHaat) याची नोंदणी करता येते. आणि हे धान्य आँनलाईन ऑर्डर करता येतो.
मंडळी विदर्भातील बदलत्या हवामानात, जलद उत्पादन, चांगली रोगप्रतिबंधकता आणि बाजारातील मागणी यांमुळे RMT-701 हे धानाचं पीक शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे. सरकारच्या विविध योजनांमधून योग्य माहिती मिळाल्यास व योग्य वेळेत लागवड केल्यास, या धानाचा शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.
तुमच्या भागात कोणता धान सर्वाधिक लावला जातो? कमेंटमध्ये जरूर कळवा.
0 टिप्पण्या