SSC Result Maharashtra दहावीचा निकाल 2025: संभाव्य तारखा आणि अपडेट्स.


Digital Gaavkari.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) 5 मे 2025 रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. राज्याचा एकूण उत्तीर्णता दर 91.88% राहिला, तर कोकण विभागाने 96.74% उत्तीर्णता दरासह अव्वल स्थान पटकावले. मुलींनी यंदाही निकालात बाजी मारली आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे.

यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेहमीपेक्षा 10 ते 12 दिवस लवकर पार पडल्या. दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात आली. परीक्षेनंतर बोर्डाने ठरवलेल्या वेळेत उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली. सध्या उत्तरपत्रिकांमधील गुणांची पडताळणी आणि गुणपत्रिकांवरील गुणांचे योग्य संकलन युद्धपातळीवर सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झालyanंतर गुणपत्रिकांची छपाई सुरू होईल, अशी माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दहावीचा निकाल 15 ते 20 मे 2025 या कालावधीत जाहीर होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, महाराष्ट्र बोर्डाने अद्याप निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. विद्यार्थ्यांना निकालाची अधिकृत घोषणा होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तो बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

बारावीच्या निकालाबाबत बोलायचे झाल्यास, यंदा 14 लाख 85 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, आणि 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागाने 96.74% उत्तीर्णता दरासह सर्वोत्तम कामगिरी केली, तर लातूर विभागाचा निकाल 89.46% असा सर्वात कमी राहिला.

दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा असली, तरी बोर्डाकडून लवकरच अधिकृत तारीख जाहीर होण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि सूचनांकडे लक्ष ठेवावे, जेणेकरून निकालाची ताजी माहिती मिळू शकेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या