बियाणे अनुदान योजना 2025 असा करा ऑनलाईन अर्ज | MahaDBT Biyane Anudan Yojana Online Form.



Digital Gaavkari

नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी!
शेती हा आपल्या देशाचा कणा आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासन वेळोवेळी विविध योजना राबवत असते. याचाच एक भाग म्हणजे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे अनुदान दिलं जाणार आहे. Biyane Anudan Yojana 2025 ही योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा घेऊन आली आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बियाणे देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे कमी खर्चात उपलब्ध करून देणे आहे या सर्व योजनेचं महिती आपणं या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.

Biyane Anudan Yojana 2025 अंतर्गत खालील बियाण्यांचा समावेश आहे.

सोयाबीन, तूर, मुग, उडीद, मका, बाजरी, भात आणि इतर खरीप हंगामातील पिके. हे बियाणे शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर देण्यात येतील. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावा.

अर्ज करण्याची पद्धत

1. सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर जा – https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin

2. त्यानंतर तुमचं लॉगिन करून ‘शेती विभाग’ अंतर्गत ‘बियाणे अनुदान योजना’ निवडा.

3. आवश्यक ती माहिती भरून, आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.

4. अर्ज सबमिट करा आणि तुमच्या मोबाईलवर मिळालेला अर्ज क्रमांक नोंदवून ठेवा.

Biyane Anudan Yojana 2025 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 मे 2025 आहे. यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी निवड 1 जून ते 3 जून 2025 दरम्यान केली जाणार आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईल नंबरवर SMS द्वारे कळवण्यात येईल.

पात्रता व अटी


अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असावा.

अर्जदाराचं नाव 7/12 उताऱ्यावर नोंदलेलं असावं.

लाभार्थीने मागील वर्षी योजनेचा लाभ घेतला असल्यास, यंदा त्याला प्राधान्य दिलं जाणार नाही.

एकच शेतकरी एका हंगामात एकदाच अर्ज करू शकतो.

Biyane Anudan Yojana 2025 या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी बांधव त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढवू शकतात. योग्य बियाण्यांमुळे पीक सुधारणा होते व उत्पादनात वाढ होते. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.

शासनाने ही योजना ऑनलाईन प्रणालीद्वारे आणल्यामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी झाली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाच्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे.

महत्वाचे मुद्दे

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 29 मे 2025

निवड प्रक्रिया – 1 ते 3 जून 2025

अर्जाची वेबसाईट  https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin

बियाणे मिळणार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर
शेतकरी बांधवांनी ही संधी गमावू नये. Biyane Anudan Yojana 2025 द्वारे मिळणाऱ्या बियाण्यांचा उपयोग करून भरघोस उत्पादन घ्यावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या