Digital Gaavkari News
Pm kissan 20 Va Hapta: नमस्कार, मी दुर्गाप्रसाद घरतकर डिजिटल गावकरी न्यूज मध्ये तुमचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान या योजनेचा 19 वा हप्ता बिहारमधील भागलपूर येथून वितरित करण्यात आला होता, 25 फेब्रुवारी रोजी. त्यानंतर आता 20 वा हप्ता कधी मिळणार? याच्याबद्दलच ही अपडेट पुढे आलेली आहे. त्यामुळे पीएम किसानचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा होण्याची शक्यता आहे, याचीच माहिती आपण घेणार आहोत. आणि त्यासोबतच हेही समजून घेणार आहोत की, पीएम किसान मधील लाभार्थ्यांची संख्या कमी होतेय की जास्त होतेय, याच्याबद्दल नेमकं काय जे काही सत्य आहे, ते पुढे आलेलं आहे, तेही समजून घेणार आहोत.
तर, राज्यातील 93 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जून मध्ये मिळण्याची शक्यता आहे. पीएम किसान या योजनेमधील नवीन नोंदणी आणि आधीच्या नोंदणीतील अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाने गाव पातळीवर घेतलेल्या मोहिमांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावाही कृषी विभागाकडून करण्यात आलाय. आणि त्यामुळे गेल्या हप्त्याच्या तुलनेत यंदा लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढेल, अशी शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. ही संख्या 50 हजारांनी वाढून 93 लाख 35 हजारांच्या पुढे जाणार आहे, असं सुद्धा बोललं जातंय.
राज्यात 19 व्या हप्त्याला ज्या शेतकऱ्यांना मिळाला, त्या शेतकऱ्यांची संख्या 92 लाख 89 हजार इतकी होती. त्यापोटी 1,967 कोटीहून अधिक रक्कम केंद्र सरकारकडून वाटली गेली होती. विसाव्या हप्त्याची रक्कम यापेक्षा जास्त राहील, कारण भूमी अभिलेख नोंदी, ई-केवायसी आणि बँक खात्याशी आधार संलग्न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे. आणि त्यामुळे पात्र लाभार्थी संख्या आता 93.35 लाखांच्या पुढे गेली आहे. केंद्र शासनाने विसावा हप्ता जून मध्ये मिळेल, याचे संकेत दिलेले आहेत. मात्र, त्याबद्दलची निश्चित तारीख अद्यापही जाहीर केलेली नाहीये.
पीएम किसान योजनेच्या आत्तापर्यंतच्या सलग 19 हप्त्यांपोटी एकूण 3,86,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना या योजनेच्या मार्फत वाटण्यात आलेले आहेत. या योजनेसाठी राज्यभरातून 123 लाखांहून जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. परंतु, त्यापैकी पीएम किसानच्या संकेतस्थळावर, म्हणजेच वेबसाईटवर जे काही कार्यरत किंवा क्रियाशील असलेले शेतकरी आहेत, त्यांची संख्या ही 96 लाख 6,000 इतकी आहे. अर्थात, त्यापैकी 79,000 शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख नोंदी अद्यावत केलेल्या नाहीत. तसंच, 1.98 लाख शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आधार क्रमांक आपापल्या बँक खात्याशी संलग्न केलेलं नाही. आणि त्यामुळे असे अडीच लाखाहून जास्त शेतकरी अजूनही या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत आणि त्यापासून बाहेर आहेत.
पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनाने घरबसल्या ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुद्धा दिलेली आहे. त्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 35 लाखांच्या पुढे गेली आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही यंत्रणेची मदत न घेता, 14 मे अखेर राज्यातील 35.51 लाख शेतकऱ्यांनी स्वतः नोंदणी पूर्ण केलेली आहे. यामध्ये पुणे आणि सांगली या दोन जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे. या दोनही जिल्ह्यांमधून प्रत्येकी दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी घरबसल्या, गाव शिवारातून पीएम किसानची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्याचंही कृषी विभागाने म्हटलं आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी मात्र सार्वजनिक सुविधा केंद्राची, म्हणजेच सीएससी सेंटरच्या मदतीने ही नोंदणी केलेली आहे.
पीएम किसानच्या सर्व हप्त्यांचा तपशील ऑनलाईन तपासता येतो. त्यासाठी pmkisan.gov.in हे वेबसाईट जे आहे, किंवा संकेतस्थळ जे आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांना जाऊन तिथे लॉगिन होताच डाव्या बाजूला ‘बेनिफिशरी लिस्ट’ असा एक पर्याय दिसतो. तिथे क्लिक केलं की, त्यानंतर तुमचं राज्य, जिल्हा, उपविभाग, गट आणि गाव निवडावा लागतो. त्यानंतर ‘गेट रिपोर्ट’वर क्लिक करताच लाभार्थ्यांच्या हप्त्याचा तपशील अधिकृतपणे शेतकऱ्यांना तिथं पाहता येतो.
तर, अशा पद्धतीने जून महिन्यात पीएम सन्मान निधी योजनेचा हा जो काही हप्ता आहे, विसावा, तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल. याबद्दलचे संकेत केंद्र सरकारनेही दिलेत. अर्थात, त्याची तारीख कधी निश्चित केली जाते, याच्याबद्दलच ही अपडेट आलं की, आपण तुमच्यापर्यंत डिजिटल गावकरी न्यूज माध्यमातून घेऊन येणार आहोत. त्यामुळे तुम्ही अजूनही डिजिटल गावकरी ब्लॉग लं सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
0 टिप्पण्या