डिजिटल गावकरी
दुर्गाप्रसाद घरतकर
Divyang e rickshaw Yojana scheme: नमस्कार मंडळी महाराष्ट्र सरकारने दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना मोफत इलेक्ट्रिक वाहने (ई-व्हेहिकल) प्रदान करण्यात येणार आहेत. या वाहनांचा उपयोग करून दिव्यांग व्यक्ती स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतील, जसे की मोबाईल शॉप, फळे आणि भाजीपाला विक्री, आईस्क्रीम विक्री, इत्यादी. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया महाराष्ट्राला सुरू झाली आहे. मंडळी आपण या योजनेची सर्व महत्त्वाची माहिती आणि ऑनलाइन अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती घेणार आहोत पण मंडळी जर तुमच्या घरी किंवा आजूबाजूला दिव्यांग व्यक्ती असेल किंवा स्त्री असेल तर ही योजना त्यांच्यार्यंत पोहचवा जेणेकरुन या योजनेचा लाभ त्यांना घेता येईल.
दिव्यांग ई रिक्षा योजनेची संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रकिया
योजनेचे नाव: दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत इलेक्ट्रिक वाहन योजना.उद्देश: दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करणे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे.
वाहनाचा प्रकार: इलेक्ट्रिक वाहने (ई-व्हेहिकल), जसे की ई-रिक्षा, ई-कार्ट, इत्यादी.
लाभार्थी: महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्ती.
अर्ज कालावधी: 22 जानेवारी 2024 ते 6 फेब्रुवारी 2025.
दिव्यांग ई रिक्षा योजनेची पात्रता अटी
रहिवासी: अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
अपंगत्व: किमान 40% अपंगत्व असणे आवश्यक आहे. अपंगत्व प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा: अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 55 वर्षे असावे.
उत्पन्न मर्यादा: दिव्यांग व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असावे.
युडीआयडी कार्ड: युनिक डिसेबिलिटी आयडी (युडीआयडी) कार्ड असणे अनिवार्य आहे.
इतर योजना: राज्यातील इतर कोणत्याही योजनेअंतर्गत मोफत ई-व्हेहिकल प्राप्त झालेले दिव्यांग व्यक्ती या योजनेसाठी पात्र नाहीत.
दिव्यांग ई रिक्षा योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
अपंगत्व प्रमाणपत्र
युडीआयडी कार्ड
आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
बँक पासबुकची प्रत
पासपोर्ट साईज फोटो
स्वाक्षरी
दिव्यांग ई रिक्षा योजनेची ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया.
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट वर जा. या वेबसाइटची लिंक 👇👇 हीं दिलेली आहे.
रजिस्ट्रेशन: वेबसाइटवर "रजिस्टर" बटनावर क्लिक करा. रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये खालील माहिती भरा:
मोबाईल नंबर ,आधार कार्ड नंबर ,युडीआयडी नंबर,ईमेल आयडी
वैयक्तिक माहिती: पुढील स्टेपमध्ये अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरा, जसे की:
पूर्ण नाव ,आईचे नाव,जन्मतारीख ,लिंग ,रक्तगट,जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
पत्ता तपशील: अर्जदाराचा पत्ता, पिनकोड, जिल्हा, तालुका आणि गावाची माहिती भरा. डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करा.
अपंगत्व तपशील: अपंगत्व प्रमाणपत्र अपलोड करा. अपंगत्वाची टक्केवारी आणि प्रकार निवडा.
रोजगार तपशील: अर्जदाराचा रोजगार स्थिती, वार्षिक उत्पन्न आणि रेशन कार्डची माहिती भरा.
बँक तपशील: बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड आणि ब्रांचची माहिती भरा. पासबुकचा पहिला पान अपलोड करा.
व्यवसाय तपशील: अर्जदार कोणता व्यवसाय करू इच्छितो याची माहिती निवडा.
फोटो आणि स्वाक्षरी: पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
ओटीपी पडताळणी: मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी टाकून पडताळणी करा.
अर्ज सबमिट: सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट झाल्यानंतर एक ॲप्लिकेशन नंबर मिळेल, तो जतन करा.
दिव्यांग ई रिक्षा योजनेच अर्जाचा स्टेटस कसा तपासायचा?
वेबसाइटवर "ट्रॅक ॲप्लिकेशन" वर क्लिक करा.
ॲप्लिकेशन नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
ओटीपी प्राप्त करून पडताळणी करा.
अर्जाचा स्टेटस पाहा (पेंडिंग, अप्रूव्हड, रिजेक्टेड, इत्यादी).
दिव्यांग ई रिक्षा योजनेविषयी महत्त्वाचे सूचना
अर्ज करताना सर्व माहिती अचूक आणि पूर्ण भरा.
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून तयार ठेवा.
अर्ज सबमिट झाल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर जतन करा.
अर्जाच्या शेवटच्या तारखेची नोंद घ्या.
Helpline: 7820904081 / 9090118218
Email: evehicle.mshfdc@gmail.com
मित्रांनो महाराष्ट्र सरकारची ही योजना दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांना रोजगार निर्मिती करण्याची एक उत्तम संधी आहे. या योजनेद्वारे दिव्यांग व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि सोयीस्कर आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घ्या आणि इतर दिव्यांग मित्रांनाही या योजनेबद्दल माहिती द्या.
जय हिंद, जय महाराष्ट्र!
मित्रांनो महाराष्ट्र सरकारची ही योजना दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांना रोजगार निर्मिती करण्याची एक उत्तम संधी आहे. या योजनेद्वारे दिव्यांग व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि सोयीस्कर आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घ्या आणि इतर दिव्यांग मित्रांनाही या योजनेबद्दल माहिती द्या.
जय हिंद, जय महाराष्ट्र!
0 टिप्पण्या