नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी!
मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न, आणि घराचं घरकुल – प्रत्येक गरीब माणसाची ही तीन स्वप्नं असतात. त्यातलं एक स्वप्न, म्हणजे स्वतःचं पक्कं घर, आता घरकुल यादी 2025 च्या मदतीने पूर्ण होणार आहे!
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY), रमाई आवास योजना, शबरी योजना, आणि पारधी आवास योजना यांसारख्या सरकारी योजना आता तुमचं आयुष्य बदलण्यासाठी सज्ज आहेत. 2025 महाराष्ट्राला राज्याच्या घरकुल योजनांच्या यादीत नवीन लाभार्थींची नावे समाविष्ट झाली आहेत. तिची महिती आपन या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत
घरकुल योजना म्हणजे काय?
घरकुल योजना म्हणजे सरकार गरजू कुटुंबांना पक्कं घर बांधायला आर्थिक मदत करते.
योजना PMAY-G आणि PMAY-U च्या अंतर्गत आहे.
शौचालय, वीज, पाणी सुद्धा मिळतं.
विशेष म्हणजे, घर बायकोच्या नावावर असतं – बाईचं सशक्तीकरण!
घरकुल योजनांची यादी – कोण कोण पात्र आहे?
1. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY-G / PMAY-U):
गावात PMAY-G, शहरात PMAY-U लागू
BPL यादीतील किंवा बेघर असलेल्यांना प्राधान्य
2. रमाई आवास योजना:
अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजासाठी
3. शबरी आवास योजना:
आदिवासी (SC/ST) साठी
4. पारधी आवास योजना:
पारधी समाजातील लाभार्थ्यांसाठी
घरकुल यादी 2025: तुमचं नाव कसं शोधायचं?
ऑनलाइन यादी बघण्यासाठी:
1. वेबसाईट उघडा:
https://pmayg.nic.in किंवा https://rhreporting.nic.in
2. "Beneficiary Details" क्लिक करा.
3. राज्य (Maharashtra), जिल्हा, तालुका, गाव निवडा.
4. आधार नंबर किंवा नोंदणी नंबर टाका.
5. यादीत तुमचं नाव असल्यास, तुम्हाला घर मंजूर झालंय!
ग्रामपंचायतीतून यादी तपासण्यासाठी
ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे नाव बघा.
कधी कधी प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) मध्येही नाव असतं.
पात्रता कशी ठरते?
PMAY-G साठी:
कच्चं घर किंवा बेघर
BPL यादीत नाव
उत्पन्न कमी, शेती 2.5 एकरपेक्षा कमी
कोणतीही सरकारी नोकरी नाही
रमाई/शबरी/पारधी योजनेसाठी
संबंधित जातींचं प्रमाणपत्
उत्पन्न मर्यादा: ग्रामीण - 1 लाख, शहरी - 3 लाख
महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव
कागदपत्रांची यादी:
आधार कार्ड, रेशन कार्ड
BPL कार्ड, जातीचं प्रमाणपत्र
7/12 उतारा किंवा जमीन दस्त
बँक तपशील, मनरेगा कार्ड (PMAY-G साठी)
घरकुल योजेसाठी सरकारकडून किती पैसे मिळतात?
PMAY-G:
1.20 लाख (सामान्य गाव)
1.30 लाख (डोंगरी भाग)
शौचालयासाठी: 12,000 रु.
मनरेगा मजुरी: अंदाजे 18,000 रु.
रमाई / शबरी / पारधी योजना:
पूर्ण घरासाठी अनुदान
50,000 रु. अतिरिक्त मदत (2024-29 दरम्यान)
PMAY-U (शहरी):
1.5 लाख रु.
गृहकर्जावर 6.5% व्याज सवलत
घरकुल योजनेचा पैसे कसे मिळतात?
टप्प्याटप्प्याने पैसे खात्यात येतात (पाया, भिंती, छप्पर, पूर्णत्व)
PFMS प्रणालीमुळे थेट बँक खात्यात ट्रान्सफर
घर बांधल्यावर फायदे:
पक्कं घर – 269 sq.ft. (25 sq.m)
शौचालय, वीज, नळजोडणी
स्थानिक कामगारांना रोजगार
सन्मान, सुरक्षितता आणि आत्मविश्वास
घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
ऑनलाइन अर्ज:
PMAY-G साठी ग्रामसेवक अर्ज करतो.
अर्जासोबत कागदपत्रं जोडून जमा करावे
2025 चे खास अपडेट्स
नवीन यादी जानेवारी 2025 मध्ये जाहीर
16.81 लाख घरांना मंजुरी, त्यापैकी 19.67 लाख घरे डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार
50,000 रु. अतिरिक्त मदत महाराष्ट्र सरकारकडून
मुख्मत्र्यांकडून गती आदेश, काम वेगात
आता काय करायचं?
1. तुमचं नाव घरकुल यादीत बघा
2. पात्र असाल तर लगेच अर्ज करा
3. सगळी कागदपत्रं तयार ठेवा
4. गावात इतरांनाही माहिती द्या
घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत – ती आपल्या कुटुंबाची सुरक्षा आहे, लेकरांचं हसतं-खिदळतं बालपण आहे. 2025 मध्ये जर तुमचं नाव घरकुल यादीत असेल, तर ते स्वप्न आता तुमचं हक्काचं होणार आहे.
चला, आजच तपासा – https://pmayg.nic.in – आणि तुमचं घर बांधायला सुरुवात करा!
0 टिप्पण्या