Digital Gaavkari
नमस्कार मंडळी मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2025 हा महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील युवकांना सरकारचा एक भाग बनवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील युवकांना रोजगार सोबतच महाराष्ट्र शासनासोबत काम करण्याची संधी मिळते. तसेच नवयुवकांना, ही संधी देण्याचं कारण म्हणजे, या डिजिटल तंत्रज्ञानाचे ज्ञान त्यांना जास्त अवगत असते. त्यामुळे त्यांचे ज्ञान आणि सरकारची साथ हे दोघी मिळून प्रशासनाच्या कामात गती वाढू शकता. त्या हेतूने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता या योजनेसाठी तुम्हालाही अर्ज करायचा असेल, किंवा या योजनेबद्दलची अधिक माहिती समजून घ्यायची असेल. तर हा लेख तुमच्यासाठी आहे. खाली तुम्हाला मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2025 बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
मुख्यमंत्री फेलोशिप योजना कार्यक्रम 2025 महाराष्ट्र काय आहे? | What is Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम युवकांना सरकारचा एक भाग बनवण्याची संधी देतो. या कार्यक्रम मार्फत रोजगार देण्याचे काम केले जात आहे. त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांची शासनाला मदत होईल तसेच त्यांचा उत्साह व तंत्रज्ञानाचे आवड यामुळे प्रशासकीय प्रगतीची गती वाढेल. या अंतर्गत नोकरी भेटल्यास कालावधी बारा महिने राहील. तसेच 61,500 पर्यंत पगार ही दिला जाणार आहे. सहा टक्के पेक्षा जास्त गुण असलेले पदवीधर विद्यार्थी अर्ज करू शकता. तसेच ज्यांचे जास्तीत जास्त शिक्षण झाले असेल असे विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
पात्रता | Eligibility Criteia
मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2025 करिता पात्रता पुढील प्रमाणे:
1) वयाची अट – उमेदवाराचे वय अर्ज सादर करते वेळी किमान 21 ते 26 वर्ष असावे म्हणजे त्याचा जन्म 05/05/1999 ते 05/05/2004 दरम्यान झालेला असावा.
2) शिक्षण पात्रता – उमेदवार 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. तसेच उच्चतम शिक्षण असल्यास प्राधान्य दिले जाईल.
3) अनुभव – उमेदवाराकडे किमान एका वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव असावा किंवा व्यवसाय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्ण वेळ इंटरनशिप /अप्रेंटीशीप/आर्टिकलशिप अनुभव म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. संपूर्ण वेळ सोयरोजगार किंवा स्वयंउद्योजकतेचा ग्राह्य धरण्यात येणार आहे.
4) उमेदवाराला मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. तसेच हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.
योजनेचे स्वरूप | Nature of Scheme
1) फेलोशिप योजना किंवा कार्यकाळ अंतर्गत मिळालेल्या पदावर रुजू झाल्यावर दिनांक पासून 12 महिने त्याचा कालावधी राहील. सर्व उमेदवारांची ज्या पदांसाठी निवड झाली असेल त्या पदासाठी सर्वांना एकाच दिवशी रुजू करण्यात येईल.
2) निवड झालेल्या फेलोची शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल. म्हणजे या प्राधिकरणामध्ये जिल्हाधिकारी व जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचा समावेश असेल.
3) प्राधिकरणावरील नेमणुकीचा निर्णय अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत घेतला जाईल. हेलो ना प्राधिकरण निवडीचा अधिकार नसेल.
4) उमेदवाराला नेमून दिलेल्या कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली काम करावे लागेल. संबंधित विभागाचे काम अधिक चांगले होईल यासाठी फेलो काम करतील. यालाच फिल्ड वर्क म्हटले जाईल.
5) फिल्ड वर्क सोबतच IIT Bombay यांनी तयार केलेल्या विशेष अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन फेलोवर असेल.
6) फिल्ड वर्क व अभ्यासक्रम एसएससी पणे पूर्ण केल्यानंतरच पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळेल.
आवश्यक कागदपत्रे | Required Documents
1) आधार कार्ड
2) पदवी मार्क शीट
3) अनुभव असल्यास सर्टिफिकेट
4) इतर संबंधित आवश्यक कागदपत्रे ओरिजनल व तसेच त्यांचे झेरॉक्स
मुख्यमंत्री फेलोशिप 2025 साठी अर्जाचे शुल्क किती
मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2025 महाराष्ट्र साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क 500 रु एवढे आहे.
लाभ पगार | Salary/ Benefits
1) फेलो ना शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्याच्या समक्ष दर्जा राहील. त्या कालावधीत कार्यालयीन वापरासाठी तात्पुरते ओळखपत्र व ई-मेल दिला जाईल.
2) दर महा पगार 56,100 रु तसेच प्रवास व इतर चर्चा साठी दरमहा 5,400 रुपये असे एकूण 61,500 रुपये दिले जातील.
3) 12 महिन्याच्या कालावधीत फक्त एकूण 8 दिवस सुटी घेता येऊ शकते.
4) फेलोशिपच्या कार्यकाळात अपघात विम्याचे संरक्षण देण्यात येणार.
5) IIT Bombay यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचे स्वतंत्र प्रमाणपत्र संस्थेमार्फत देण्यात येईल.
निवड प्रक्रिया | Selection Process.
उमेदवाराची निवड दोन टप्पे मार्फत केली जाईल. त्याबद्दलची माहिती खालील प्रमाणे:
टप्पा 1: आधी ऑनलाईन परीक्षा होईल. मग सर्वाधिक गुणाच्या आधारे दुसऱ्या टप्प्यासाठी 210 उमेदवार स्वार्थ लिस्ट केले जातील.
टप्पा 2: या टप्प्यात शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार निबंध अपलोड करते त्यानंतर मुलाखतीसाठी बोलवले जाईल शेवटी अंतिम निवड यादी जाहीर केले जाईल.
उमेदवारांना अंतिम निवड यादीत नाव येण्यासाठी एकूण गुण 100 पैकी सर्वाधिक गुण मिळवावे लागतील ज्या उमेदवारांना जास्त गुण असतील असे 210 उमेदवार मुलाखतीसाठी बोलवण्यात येतील.
शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना एका विषयावर लेखी निबंध सादर करावा लागेल आता तो विषय कोणता असेल त्याची माहिती शॉर्टलिस्ट उमेदवारांनाच कळवण्यात येईल निबंध हा मराठी हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असू शकतो. जे उमेदवार निबंध सादर करतील त्यांना आज मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
महत्त्वाच्या तारखा | Important Dates.
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 15 एप्रिल 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 मे 2025
- अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 05 मे 2025
- Mock Test तारीख: 8/9 मे 2025
- परीक्षेची तारीख: 10/11 मे 2025
ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप | Online Examination
- बहु विविध पर्याय असलेले वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न (MCQ)
- परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल व जेथे गरज असेल ते प्रश्न मराठी भाषांतर पुरवले जातील.
- एकूण गुण: 100 प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल
- कालावधी: 60 मिनिटे.
-
अंतिम निवड | Final Selection
ऑनलाइन परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना अंतिम निवळीसाठी खालील प्रमाणे मार्गीन प्रणाली असणार आहेत जसे की, परीक्षेचे 100 गुण पैकी 30 गुण + निबंध 20 गुण + मुलाखत 50 गुणांमध्ये रूपांतरित केले जाईल शेवटी 60 उमेदवारांची यादी करण्यात येईल.
महत्त्वाच्या सूचना | Important Instruction For Students
मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांनी आपल्या सोबत सर्व मार्कशीट तसेच अनुभव असल्यास त्यांचे सर्टिफिकेट आणि आयडी प्रूफ व इतर संबंधित कागदपत्रे ओरिजनल सोबतच त्यांचे झेरॉक्स आणणे आवश्यक.
इंटरव्यू साठी पात्र असलेल्या उमेदवारांना इंटरव्यू चा दिवस व वेळ ई-मेल द्वारे कळविण्यात येईल तसेच इंटरव्यू साठी हजर राहण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रवास खर्च किंवा इतर खर्च दिला जाणार नाही.
अटी व शर्ती | Terms and Condition
1) मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम किंवा योजना हा पूर्ण वेळ कार्यक्रम आहे. म्हणून उमेदवार त्या कालावधीत कुठल्याही प्रकारची इतर नोकरी किंवा खाजगी नोकरी किंवा कुठलाही कोर्स करू शकणार नाही.
2) या योजनेत एकदाच सहभागी होत आहे ते यामध्ये कुठल्याही प्रकारचे मुदत वाढ किंवा पुन्हा नियुक्ती होणार नाही.
3) 12 महिन्याच्या कालावधीनंतर हा कार्यक्रम नोकरीची हमी देत नाही.
4) ज्या विभागात उमेदवाराला रुजू केले जाईल त्याचा कामकाजचा वेळ त्याला लागू राहील.
5) विभागाच्या कामकाजाच्या गरजेनुसार अधिक तास काम करणे किंवा प्रवास करणे बंधनकारक राहील.
6) उमेदवाराची निवड ज्या शहरासाठी किंवा जिल्ह्यासाठी होईल त्याला त्या ठिकाणी राहावे लागेल. त्याची राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही.
7) ऑफर लेटर मिळाल्यानंतर त्याच दिवशी त्याच वेळेला हजर राहणे बंधनकारक असेल नाहीतर नियुक्ती रद्द केले जाईल. उमेदवाराला कुठल्याही राजकीय चळवळीत भाग घेता येणार नाही.
0 टिप्पण्या