Digital Gaavkari News
Durgaprasad Gharatkar.
Pakistan Train Attack News: नमस्कार मंडळी पश्चिम पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात 11 मार्च रोजी दुपारी एक ट्रेन हायजॅक झाली. या ट्रेनमध्ये 400 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. ही हायजॅक घटना बलुचिस्तानमधील बंडखोर संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) यांनी अंजन दिली. ट्रेन हायजॅक झाल्याची बातमी मिळाल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. जवळपास 36 तासांनी हे ऑपरेशन पूर्ण झाले, परंतु या कालावधीत 25 प्रवाशांची हत्या झाली. पाकिस्तानी सैन्याने 33 बंडखोर ठार मारल्याचा दावा केला, परंतु या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानी सैन्याचेही अनेक जवान मारले गेले.
11 मार्च रोजी दुपारी एक वाजता बलुचिस्तानमधील सर्वात मोठे शहर क्वेटा येथून नऊ डब्यांची जाफर एक्सप्रेस ट्रेन पेशावरच्या दिशेने निघाली. या ट्रेनमध्ये 400 पेक्षा जास्त प्रवासी होते. ट्रेन सकाळी नऊ वाजता क्वेटाहून निघाली आणि ती सीबी येथे दुपारी दीड वाजता पोहोचणार होती. परंतु, त्याआधीच बलुचिस्तानच्या बोला जिल्ह्यातील मशकाफ भागात बलुच लिबरेशन आर्मीने ट्रेनवर हल्ला केला. बलुचिस्तानचा हा भाग डोंगराळ असल्याने येथे 17 बोगदे आहेत आणि ट्रेन हळू चालवावी लागते. याचाच फायदा बलुच बंडखोरांनी घेतला. त्यांनी मशकाफ मधील बोगदा क्रमांक आठ येथे रेल्वे ट्रॅक बॉम्बस्फोट करून उडवला, ज्यामुळे जाफर एक्सप्रेस बोगद्यात येताच डोळावरून घसरली. यानंतर बंडखोरांनी ट्रेनवर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात ट्रेनचा ड्रायव्हर जखमी झाला. ट्रेनमध्ये पाकिस्तानच्या सुरक्षा दलाचे जवान, पोलीस आणि काही आयएसआय एजंटही प्रवास करत होते. त्यांनी बलुच आर्मीच्या हल्ल्याला प्रतिउत्तर दिले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, हल्ल्याच्या वेळी ट्रेन खूप हळू जात होती. अचानक ट्रॅकवर स्फोट झाला आणि ट्रेन थांबली. लगेच आसपासच्या डोंगरातून बंडखोर बाहेर आले आणि त्यांनी अंधाधुंध गोळीबार सुरू केला. बंडखोरांनी ट्रेन ताब्यात घेतल्यानंतर प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. जे प्रवासी खाली उतरले नाहीत, त्यांना मारून टाकण्याची धमकी देण्यात आली. प्रवासी खाली उतरल्यानंतर बलुच आर्मीचे बंडखोर शांत बसले नाहीत. त्यांनी महिला आणि वृद्धांना वेगळे केले. या संधीचा फायदा घेऊन काही प्रवासी पळून गेले. बंडखोरांनी सिंधी, पंजाबी, बलूच आणि पश्तून प्रवाशांना वेगळे केले आणि सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांना ओळखपत्रे पाहून गोळ्या मारल्या. बलुच लिबरेशन आर्मीने ट्रेनवर पूर्ण नियंत्रण मिळवल्यानंतर त्यांनी पाकिस्तान सरकारकडे तुरुंगात असलेल्या बलुच नेत्यांची सुटका करण्याची मागणी केली. त्यांनी सरकारला 48 तासांचा अल्टीमेटम दिला.
ही घटना मंगळवारी दुपारी घडली. यानंतर काही तासात पाकिस्तानी सैन्याने प्रवाशांना सोडवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. या ऑपरेशनला 36 तास लागले. पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नकवी यांनी सांगितले की, ते निष्पाप नागरिकांवर गोळीबार करणाऱ्या बलुच बंडखोरांसोबत कोणतीही तडजोड करणार नाहीत. हायजॅकच्या वेळी शेकडो बंडखोरांनी ट्रेनवर हल्ला केला होता, परंतु रात्रीपर्यंत त्यातले अनेक बंडखोर तिथून निघून गेले होते. रात्री सुमारे 25 ते 30 बंडखोर ट्रेनवर नजर ठेवण्यासाठी तिथेच होते. रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाल्यावर पाकिस्तानी सैन्याने ड्रोन आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली. सैन्य ट्रेनमध्ये शिरण्याच्या तयारीत होते, परंतु हे काम सोपे नव्हते. कारण बंडखोरांनी स्फोटकांनी भरलेले जॅकेट घातले होते आणि ते प्रवाशांचा मानवी ढाल म्हणून वापर करत होते. पाकिस्तानी सैन्याने स्नायपर्सची मदत घेऊन बंडखोरांवर अचूक नेम लावून त्यांना ठार मारले.
यानंतर सैनिकांनी ट्रेनमध्ये प्रवेश करून प्रवाशांना सोडवले. मंगळवारी रात्रभर हे ऑपरेशन सुरू होते. बुधवारी सकाळपर्यंत पाकिस्तानी सैन्याने दीडशे प्रवाशांना सोडवले, परंतु अजूनही काही प्रवासी बंडखोरांच्या ताब्यात होते. बुधवारी रात्रीपर्यंत हे ऑपरेशन सुरू होते. पाकिस्तानी सैन्याने 190 पोलिसांना सोडवले, परंतु त्यांना पुन्हा हल्ला होण्याची शक्यता होती. त्यामुळे मंगळवारी सोडवलेल्या पोलिसांना क्वेटाला पाठवण्यात आले, तर बुधवारी सोडवलेल्या पोलिसांना मार्च भागात पाठवण्यात आले. पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, त्यांनी 33 बंडखोर ठार मारले आणि सर्व पोलिसांची सुटका केली. या घटनेत 21 प्रवासी आणि चार सैनिक मारले गेले. पाकिस्तानी सैन्याने हा कट अफगाणिस्तानातून ऑपरेट होत असलेल्या दहशतवादी गटाने रचल्याचा आरोप केला. बलुच आर्मीने सांगितले की, त्यांनी पाकिस्तानच्या शंभर जवानांना मारले आणि अजूनही दीडशे पोलिस त्यांच्या ताब्यात आहेत. पाकिस्तानी सैन्याने हे दावे खोडून काढले, परंतु क्वेटाच्या रेल्वे स्टेशनवर 200 शवपेट्या पाठवल्याचे फोटो व्हायरल झाले. या घटनेबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत ज्यामुळे धोका अजूनही कायम आहे.
0 टिप्पण्या