Digital Gaavkari News
दुर्गाप्रसाद घरतकर
Namo shetkari sanman yojana 6th installment 2025: नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दुर्गप्रसाद घरतकर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आणि त्यासोबतच मागील प्रलंबित हप्ते आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी झाला आहे. हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे आणि त्याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.
मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ आणि यापूर्वीचे प्रलंबित हप्ते अदा करण्यासाठी १,६४२.१८ कोटी रुपये इतका निधी वितरित करण्याचा जीआर २६ मार्च २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे. या जीआरमध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे, ते आपण पाहूया.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रुपये मिळतात, म्हणजेच दर चार महिन्यांनी २,००० रुपये सन्मान निधी दिला जातो. आता या योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्यासाठी निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आहे. यामध्ये ज्यांचे मागील हप्ते प्रलंबित असतील, त्यांना ते हप्तेही मिळतील आणि सहाव्या हप्त्यासह हा निधी त्यांच्या खात्यात जमा होईल.
या शासन निर्णयात काय सांगितले आहे ते समजून घेऊया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता, म्हणजेच डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीचा हप्ता, आणि यापूर्वीचे प्रलंबित हप्ते लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे. याला मान्यता देण्यात आली असून, हा खर्च लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २,००० रुपये सन्मान निधी लवकरच जमा होईल. ज्यांचे हप्ते थकलेले आहेत, त्यांना ४,००० किंवा ६,००० रुपये, जे थकले असतील तेही जमा होतील, असे सांगण्यात आले आहे.
मात्र, याची निश्चित तारीख अजून जाहीर झालेली नाही. तारीख निश्चित झाल्यानंतर त्याबाबतची माहिती आमच्या वेबाइटवरून प्रथम दिली जाईल. त्यामुळे ग्रूप जॉईन करून ठेवा, जेणेकरून येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. ही महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी ही बातमी शेअर करा.
धन्यवाद! जय हिंद, जय महाराष्ट्र!.
0 टिप्पण्या