Digital Gaavkari
Durgaprasad Gharatkar.
नमस्कार मित्रांनो उन्हाळ्याचा तडाका वाढू लागला आहे आणि याच उन्हाळ्यात एका पिकाला देशभरातून मागणी वाढत आहे ते म्हणजे पुदिना थंडगार गुणधर्म आणि त्याचा औषधी तसेच सुगंधी वापर यामुळे पुदिना आता शेतकऱ्यांसाठी एकदम कमाईचा राजा बनला आहे आपला भारत देश तर पुदिना तेलाचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार आहे त्यामुळे अनेक शेतकरी आता या पुदिनाच्या शेतीकडे वळू लागले आहेत चला तर मग शेतकऱ्यांना कमी खर्चात लाखोंची कमाई करून देणाऱ्या याच पुदिना शेतीबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
नमस्कार मी दुर्गाप्रसाद घरतकर पुदिनाची शेती शेतकऱ्यांसाठी खरच फायद्याची आहे जर एखाद्या शेतकऱ्याला एक एकर मध्ये पुदिना लावायचा असेल तर त्याला फक्त 30 हज रुपये खर्च येतो आणि एका एकरातून जवळपास एक लाख रुपयापर्यंत पुदिना तेल मिळवता येत म्हणजे खर्च वजा केला तर शेतकऱ्याला एका एकरात 70 हजार रुपयांचा नफा सहज मिळतो आणि हा नफा वर्षातून दोनदा मिळवता येतो म्हणजे विचार करा यामुळे किती फायदा होऊ शकतो पुदिन्याची लागवड नेमकी कधी करावी चला तर मग जाणून घेऊया या पुदिना लावण्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च महिना एकदम बेस्ट आहे या काळात हवामान पुदिन्याच्या वाढीसाठी एकदम अनुकूल असत तर यासाठी जमीन कशी पाहिजे तर सुपीक माती लागते आणि मातीचा पीएच स्तर सहा ते 7.5 च्या दरम्यान असावा शेतात चांगली नांगरणी करून जमीन भुसभुशीत करून मग पुदिना लावा आणि पुदिना लावल्यावर लगेच शेताला हलके पाणी द्यायला विसरू नका तसेच चांगले उत्पादन घेण्यासाठी खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
पुदिन्याला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि गंधक खतांची गरज असते हे खत किती प्रमाणात वापरायचे तर साधारणपणे प्रति हेक्टर 120 ते 150 kg नायट्रोजन 50 ते 60 kg फॉस्फरस 40 kg पोटॅश आणि 20 kg गंधक पुरेसे आहे खत व्यवस्थित आणि वेळेवर दिलं तर पुदिना एकदम जोमाने वाढतो त्यानंतर पुदिना पीक साधारण 100 ते 120 दिवसात काढणीला येत झाडांना जेव्हा कळ्या दिसायला लागतात तेव्हा समजावे की पुदिना कापणीसाठी तयार झाला आहे कापणी करताना झाडाच्या वरचा चार ते पाच सेंटीमीटर भाग कापावा आणि विशेष म्हणजे पुदिन्याची कापणी वर्षातून दोन वेळा करता येते म्हणजेच एका खर्चात दुप्पट कमाई पुदिन्याच्या तेलाला बाजारात खूप मागणी आहे आणि भाव पण चांगला मिळतो पुदिन्याच्या तेलाची किंमत प्रति लिटर 1800 ते 3500 रुपयापर्यंत असते त्यामुळे पुदिना शेतीतून खरच शेतकरी लखपती होऊ शकतो.
मित्रांनो पुदिना शेतीचे फायदे अनेक आहेत खर्च कमी आणि नफा जास्त हे तर आहेच पण औषधी आणि सुगंधी उद्योगात पुदिन्याला खूप मागणी आहे पुदिना लवकर तयार होतो आणि वर्षातून दोन वेळा कापणी करता येते आणि उन्हाळ्यात तर पुदिन्याची विक्री वाढते आणि त्यामुळे जास्त फायदा मिळवता येतो म्हणून शेतकरी मित्रांनो पुदिना शेती तुमच्यासाठी खरच एक उत्तम संधी आहे जर व्यवस्थित नियोजन आणि व्यवस्थापन केले तर यातून नक्कीच तुम्हाला लाखोचा नफा कमवता येऊ शकतो तसेच पुदिना शेतीबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही कृषी विभागाच्या वेबसाईटला भेट देऊ शकता आणि तुमच्या जवळच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकता तर माहिती देणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तसेच या व्यवसायाबद्दल या शेतीबद्दल तुम्हाला अजून माहिती पाहिजेत असेल तर कमेंट करा आणि लवकरच या बिजनेस विषयी माहिती तुम्हाला या वेबसाईट वरती देऊ.
0 टिप्पण्या