सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू रात्रीचे सिंचन जीवावर बेतले





लाखनी:- नरेंद्र मेश्राम 

शेतात उन्हाळी धानाचा रोवना करण्याकरिता चिखलावर पाणी सोडण्याकरिता शेतावर जाताना शेतावर विषारी सापाने दंश केला. रात्रीच्या अंधारात त्याला दिसले नाही. मात्र पायाला काहीतरी रुतल्यागत वाटले. त्याने गावात येत मित्रासोबत मुरमाडी/तूप. ता.लाखनी येथील आरोग्य केंद्रात उपचार करून पुढे लाखनी येते रेफर करण्यात आले. तिथूनही पुढे भंडार्याकरिता रेफर करण्यात आले. मात्र वाटेतच(गडेगाव जवळ) रात्री ११ वाजे दरम्यान मृत्यू झाला .लाखनी तालुक्यातील झरप येथे घडली.

जाधव नारायण शिवणकर (६५) रा. झरप पो. भुगाव तालुका लाखनी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात दोन मुले व दोन मुली आहेत.

महावितरणच्या नियोजनाने शेतकऱ्यांना रात्रीला सिंचनाची वीज मिळते. शेती रात्रीची झाली आहे. मृतक जाधव कडे दोन एकर शेती आहे. शेती करिता ८ तास विजेचे नियोजन आहे. चार दिवस दिवसपाळीत तर तीन दिवस रात्रपाळीत शेतकऱ्यांना वीज मिळते. रात्रपाळीत शेतकऱ्यांना स्वापदे व वन्य प्राण्यांचा धोका पत्करून शेती करावी लागत आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बळी जाधव ठरला आहे. परिसरात महावितरण व महाराष्ट्र शासनाच्या धोरणा विरोधात मोठा रोष व्यक्त होत आहे. पालांदूर पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या