Digital Gaavkari News
PM Kisan New updates: नमस्कार मंडळी,पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक आता अनिवार्य करण्यात आला आहे. हप्त्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले असून शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहेत.
शेतकरी ओळख क्रमांकाची फार्मर आयडी ( farmer Id) ची अट देखील लागू करण्यात आली आहे.
नवीन अट काय आहे?
▪️पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी वितरीत केला जाणार आहे.
▪️या हप्त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांकाची अट लागू होणार नाही. मात्र 20 व्या हप्त्यापासून शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडी ( farmer Id) बंधनकारक होणार आहे.
▪️नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, पती-पत्नी आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुटुंबातील सदस्यांची आधार नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.
▪️नियमांचे पालन केले नाही तर पीएम किसानचे पैसे मिळवण्यास शेतकरी पात्र ठरणार नाही.
जर तूम्ही आतापर्यंत फार्मर आयडी ( farmer Id) काढली नसेल तर लवकर सीएससी सेंटर वर जाऊन काढून टाका. कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..
0 टिप्पण्या