भंडारा जिल्हा परिषदेवर आता काँग्रेसचे वर्चस्व



डिजिटल गावकरी

भंडारा:- भंडारा जिल्हापरिषद सभापती पदाच्या निवडणुकीने राजकीय वातावरण तापले होते  मात्र सभापती निवडणुकीत समाजकल्याण सभापती म्हणुन शीतल राऊत व महीलाव बालकल्याण सभापती म्हणून सौ.अनिता नलगोखुलवार यांची ईश्वर चिठ्ठीने निवड झाल्याने चित्र बदलले नंतर बांधकाम सभापती इश्र्वरकर तसेच शिक्षण व आरोग्य सभापती म्हणुन आनंद मल्लेवार यांची निवड करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यात आले होते. मात्र महायुतीच्या तावडीतून अख्खी जिल्हा परिषद स्वतःकडे ओढत नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये आपलं वर्चस्व दाखवून दिला आहे.

जिल्हा परिषदेचे निवडणुकीच्या आधी जिल्हा परीषद अध्यक्ष पद कायदेशीर मार्गाने सौ. कविता जगदिश उईके यांच्या मार्फत काँग्रेस पक्षा कडे आले.

सभापती निवडणुकीच्या काही तासापूर्वी भारतीय जनता पार्टीचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चार असे पाच सदस्य गायब झाले होते. हे पाचही सदस्य फुटल्याने भंडारा जिल्हा परिषद काँग्रेसचे वर्चस्व वाढले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या