जयेंद्र देशपांडे समाज जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित.





Digital Gaavkari News 

भंडारा :- जिल्ह्यातील दशबल पहाडी सितेपार/हत्तीडोई येथील सम्राट अशोक कालीन अवशेष असलेल्या ठिकाणी 31 व्या माघ पौर्णिमा वर्धापन दिनानिमित्त आयोजित धम्म परिषदेत सन्मा. जयेंद्र गुलाब देशपांडे यांना समाज जीवन गौरव पुरस्काराने सन्मान पत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षां पासुन सामाजिक क्षेत्रात देशपांडे यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे.

सामान्य जनतेला त्यांचे न्याय्य व हक्क मिळवून देण्यासाठी निस्वार्थ प्रयत्न करत असतात.

जयेंद्र देशपांडे च्या अंगी असलेला प्रामाणिकपणा,समर्पण, सामाजिक कार्याच्या क्षेत्रांतील अष्टपैलूत्व यांनी समाजाच्या उत्थानासाठी महत्त्वाची भूमिका म्हणून बजावली आहे.

सामाजिक क्षेत्रातील सहभाग आणि सामाजिक बांधिलकी जपणारा व्यक्तीमत्व म्हणून देशपांडे ची ख्याती आहे.

एकंदरीत अविरतपणे सामाजिक क्षेत्रातील मौलिक दखल घेत केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली तर्फे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ.देवानंद नंदागवळी यांनी मा.प्रमोदजी गणवीर साहेब वि.स.क. सामा.न्याय विभाग भंडारा यांच्या हस्ते जयेंद्र देशपांडे यांना समाज जीवन गौरव पुरस्काराने सन्मान पत्र प्रदान करून सन्मानित केले.

यावेळ डॉ.रतनकुमार गेडाम, डॉ.सुरेश नामदेव सुर्यवंशी, मा.श्रीराम गणेर साहेब,मा.नाशिकजी चवरे,मा.छाया चव्हाण-रंगारी ,मा. रंजीता नंदागवळी तसेच समता सैनिक दलाच्या सैनिक, पदाधिकारी सह आदींनी जयेंद्र देशपांडे चे तोंडभरून कौतुक करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या