सरकारचा मोठा निर्णय ! 'लाडकी बहीण' योजनेत मोठा बदल, दरमहिन्याला फक्त ५०० रुपये मिळणार?

 

Digital Gaavkari News 

Ladki Bahin Yojna lastest update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची आता निकषांनुसार पडताळणी सुरु झाली आहे. 

पहिल्या टप्प्या -चारचाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरु.

दुसरा टप्पा - महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न खरोखर अडीच लाखांपेक्षा कमी आहे का, तपासले जाणार.

तिसरा टप्पा - एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला लाभार्थींचीही पडताळणी होणार.

अपात्र महिलांकडून रक्कम परत घेणार.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरलेल्या महिलांकडून रक्कम परत जमा करून घेतली जाणार आहे. रक्कम जमा करून घेण्यासाठी लाडक्या बहिणींना.

खात्यात थेट पैसे जमा करता येतील.

 किंवा 

जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात पैसे जमा करावे लागणार.

किंवा 

तालुक्याच्या बालविकास प्रकल्प कार्यालयात देखील रक्कम जमा करता येईल.

लाडक्या बहिणींच्या पडताळणीचे संभाव्य टप्पे असे.

एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी.

बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणारे.

कुटुंबातील व्यक्तीला निवृत्तिवेतन, तरी लाभ घेणाऱ्या महिला.

अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न.

पाच एकरापेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी.

दरमहिन्याला फक्त ५०० रुपये मिळणार

केंद्र सरकारची शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत महिलांना दोन्ही योजनांमधून दरमहा एक हजार रुपये मिळतात. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील यातील महिलांचा दरमहा १,५०० रुपयांचा लाभ कमी करून आता त्यांना दरमहा केवळ ५०० रुपयेच दिले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून घेण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या