विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणाकारिता स्नेहसंमेलनाची गरज- राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे .

 


Digital Gaavkari News 

भंडारा:- अड्याळ येथील उत्तर बुनियादी जिल्हा परिषद शाळेतील वार्षिक उत्सव कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणुन संजय भांबोरे म्हणाले की,

विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणाकरिता वर्षातून एकदा शाळेतून  स्नेहसंमेलनाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.संजीव भांबोरे यांनी दिनांक 7 फेब्रुवारी 2025 ला उत्तर बुनियादी जिल्हा परिषद शाळा येथे त्त्याग मूर्ती रमाई यांची जयंती  असल्याचे सांगून  माता रमाई ने आपल्या परिश्रमातून बाबासाहेबांना घडविले आणि त्याच बाबासाहेबांनी  संविधान लिहून विविध जाती धर्माच्या लोकांना एका छत्र छायेखाली एकत्र आणून त्यांना संविधानाच्या माध्यमातून त्यांचे हक्क  अधिकार मिळवून देण्याचे काम केले.  असल्याची आठवण करून दिली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन अड्याळ येथील सरपंच शंकर मानापुरे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशील कोडापे हे होते .प्रमुख अतिथी म्हणून प्रेस संपादक सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे , शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विकास टेंभुर्णे , माजी अध्यक्ष कल्पनाताई जांभुळकर , माजी अध्यक्ष शेवंता  करंजेकर ,नितीन वरंटीवार , मुख्याध्यापक राजेश श्रीरामे ,अन्वर पठाण, वसीम पठाण ,  ग्रामपंचायत सदस्य शिल्पा गभने   , ग्रामपंचायत सदस्य वसुश्री टेंभुर्णे, ग्रामपंचायत सदस्य तर्जुले   ,माला नगरे, शरद नगरे, सुनीता खोब्रागडे, देवकन्या करंजेकर , जावेद शेख ,व गावातील पालक वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुला मुलींचे नृत्य गीत घेण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रामरतन मोहुरले यांनी केले. प्रास्ताविक  केंद्रप्रमुख रोशन ईळपाते यांनी केले ,आभार हंसराज जांभुळकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या