
भंडारा: भंडारा जिल्ह्यातील निसर्गरम्य ऐतिहासिक दशबल पहाडी सितेपार( हत्तीडोई) येथे माघ पोर्णिमा दिनी धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या प्रसंगी उत्कृष्ट प्रबोधन, गायन करणारे सामाजिक कार्यकरता आणि सदैव अग्रेसर राहत असलेले गित - संगितांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे प्रबोधनकार प्रविण भोंदे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची पावती म्हणून दशबल पहाडी हत्तीडोई (सीतेपार) येथे माघ पौर्णिमा दिनी केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली च्या महाराष्ट्र प्रदेश राज्य संघटने च्यावतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी यांच्या हस्ते समाज जीवन गौरव पुरस्कार व भारतीय संविधान प्रदान करुन सम्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी नाशिक चवरे, शिलानंद नंदागवळी, डॉ. अमृत नारनवरे, महेंद्र तिरपुडे, मुन्ना कांबळे व बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या