रेशनचा गहू खाताय? सावधान ! अख्खं गाव झालं टक्कल, महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार उघड.


डिजिटल गावकरी न्यूज़
दुर्गाप्रसाद घरतकर

नमस्कार मंडळी बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव आणि नांदुरा तालुक्यामध्ये होत असलेल्या केस गळतीची चर्चा राज्यभर नव्हे तर देशभर झाल्याचे पाहायला मिळालं. या केस गळतीचं शोध घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथक देखील बुलढाणा जिल्ह्यात दाखल झालं होतं.

केस गळतीच्या खऱ्या कारणाचा आता शोध लागला असून रेशन दुकानांमार्फत वितरीत करण्यात आलेल्या विषारी गव्हामुळे टक्कल व्हायरसचा प्रसार झाल्याचे उघडकीस आले आहे.

राज्यातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव आणि नांदुरा या तालुक्यामध्ये काही गावांमध्ये केस गळतीची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागल्याने लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. केस गळतींच्या कारणांचा शोध घेत असताना अनेकांनी दूषित पाण्यामुळे केस गळतीचा प्रकार होत असल्याचा कयास लावला होता. तसेच अन्य कारणांचा देखील आरोग्य विभागामार्फत शोध घेतला जात होता. मात्र केस गळतीचं खरं कारण हे रेशन मार्फत वितरित केले गेलेले गहू असल्याचे समोर आल आहे.

रेशन दुकानांमार्फत नागरिकांना वितरित करण्यात आलेल्या गव्हामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सेलेनियम आढळला आहे.* ज्यामुळेच नागरिकांच्या डोक्यावरील केसांची गळती झाल्याचा शोध संशोधक हिम्मतराव बावस्कर यांनी लावला आहे. तसेच केस गळतीच्या या प्रकरणावर सरकारकडून देखील प्रचंड गोपनीयता बाळगली जात असून बुलढाणा जिल्ह्याला रेशनद्वारे धान्य वितरित करणाऱ्या गोदामांना कुलूप ठोकण्यात आल आहे.या प्रकरणाचा थेट पंजाब हरियाणा संबंध असल्याचे सांगितले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या