Digital Gaavkari News
Durgaprasad Gharatkar
लाखनी :- बापूसाहेब लाखनीकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाखनी येथे संस्थेच्या प्राचार्या. जे. व्ही.निंबार्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण सोहळा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनीचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भंडारा जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. एन. लाकडे साहेब उपस्थित होते. उपस्थित सर्व अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक उमेश सिंगनजुडे आणि प्रमुख अतिथी म्हणून एम.एम.पी. कंपनी मारेगावचे व्यवस्थापक राकेश वाघाये साहेब आणि संस्थेच्या प्राचार्या जे. व्ही. निंबार्ते मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटक आल्हाद भांडारकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रशासन आणि शिस्त विषयक माहिती दिली. नुसती शिवजयंती साजरी करून चालणार नाही तर शिवाजी महाराज यांचे विचार स्वतःच्या डोक्यात भिनवयाची आज आपल्याला गरज आहे असे आपल्या भाषणातून सांगितले . कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.उमेशसिंगनजुडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवन चरित्र आणि कार्य विषयक माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राकेश वाघाये यांनी कौशल्य विकास विषयक माहिती प्रशिक्षणार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी व्ही . एन. लाकडे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आपल्याला कधीच विसरता येणार नाही. शिवाजी महाराज यांच्या विचारांची आधुनिक काळात खूप जास्त गरज आहे असे आपल्या भाषणात सांगितले. संस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या अनावरण कार्यक्रम प्रसंगी रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रश्नमंजुषा स्पर्धा, डान्स स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या स्पर्धकांना अतिथींच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निदेशक चक्रधर पाखमोडे, प्रास्ताविक भाषण संस्थेच्या प्राचार्या जे. व्ही. निंबार्ते मॅडम आणि आभार प्रदर्शन गटनिदेशक प्रशांत बेतावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निदेशक दिगांबर उरकुडे, राजू भुरे, शुभम सरकाटे, मोहन रहाटे, हेमंत पिल्लेवान, नितेश सतदेवे, तेजराम बडवाईक, चक्रधर पाखमोडे, नागेश बहिरे, विजय येटरे, ईश्वरी भिवगडे मॅडम, सीमा सतदेवे मॅडम, प्रशांत वैद्य, प्रकाश भुते, राहुल पवार , रामटेके, आर. डी. बावनकुळे, एस. डी.बावनकुळे यांनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या