शिवनगरी ले आऊट मध्ये शिवजयंती निमित्त विविध स्पर्धा.


Digital Gaavkari News

लाखनी :-शिव बहुद्देशीय सेवाभावी संस्था, शिवनगरी ले आऊट लाखनीच्या वतीने तीन दिवशीय शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.शिवजयंती निमित्त १८, १९, २०फेब्रुवारीला विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.१८ फेब्रुवारीला शिवगीत गायन, शिववक्तृत्व व शिवनृत्य स्पर्धा, १९ फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता शिवपुजन, शिववंदना, शिवआरतीचा कार्यक्रम लाखनी नगर पंचायतचे मुख्याधिकारी आशिष घोळे यांच्या शुभहस्ते, प्रविण शेलार यांच्या अध्यक्षतेखाली, नगरसेवक बबलू निंबेकर, प्रदीप तितीरमारे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे. दुपारी 12 वाजता महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. नीलिमा कापसे, प्रमुख अतिथी गीताताई तितीरमारे, रत्नमाला हुकरे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी रांगोळी स्पर्धा, उखाणा स्पर्धा, विविध शारीरिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. २०फेब्रुवारी ला सत्कार समारंभ व बक्षीस वितरण सोहळा असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या विद्या कुंभरे, विशेष अतिथी जि प सदस्या डॉ.मनिषा निंबार्ते, नागराध्यक्षा त्रिवेणी पोहरकर, ऍड. होमेश्वर रोकडे, नगरसेवक प्रदीप तितीरमारे, माजी सरपंचां येमू गायधनी यांच्या हस्ते इयत्ता दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी सत्कार,स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी तसेच सेवा निवृत्त कर्मचारी यांचा सत्कार तर विविध स्पर्धामध्ये विजेत्या ठरलेल्याना बक्षीस वितरण होणार आहे. तीन दिवशीय शिवजयंती सोहळ्याला उपस्थित्त राहण्याचे आवाहन शिव बहुद्देशीय सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. उमेश सिंगनजुडे, उपाध्यक्ष राजकुमार खोब्रागडे, सचिव जगदीश धांडे, कोशाध्यक्ष किशोर धरमसारे, विनोद बांते, धनपाल हुकरे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या