राज्यस्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेत संत शिवराम विद्यालय द्वितीय.

 


Digital Gaavkari News 

भंडारा:- स्थानीय विदर्भ हाउसिंग बोर्ड कॉलनी स्थित संत शिवराम महाराज माध्यमिक विद्यालयाने महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय  क्रीडा परीषद व्दारा शासकिय विज्ञान महाविद्यालय  गडचिरोली येथे आयोजीत राज्यस्तरीय शालेय टेनिक्वाईट  क्रीडा स्पर्धेत वयोगट 19 मध्ये मुंबई व  पुणे टेनिक्वाईट संघाला पराभुत करुन द्वितीय क्रमांकाचे  स्थान पटकाविले व भंडारा जिल्ह्याला टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेत मानाचा तुरा मिळवून दिल्याने या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

या राज्यस्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेत शाक्य मेश्राम, सोहिल केवट, रौनक भोयर,कुणाल सतदेवे, तुषार कांबळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. 

यशस्वी खेळाडूंनी  आपल्या यशाचे श्रेय क्रीडा व युवक सेवा नागपुर विभाग नागपूर चे उपसंचालक शेखर पाटील, गडचिरोली जिल्हा क्रीडा अधिकारी  भास्कर घटाळे    भंडारा जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. लतिका लेकुरवाळे,शारीरिक शिक्षक  संजय पडोळे, कोच अरुण बांडेबुचे, जितेश हलमारे, कु.रेणुका व्यावहारे, कु.तनु मेश्राम, सुरज दुधकवर, यांना देत आहेत तर महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशन रेप्री बोर्ड चेअर मण  ॲड. मृणाल बांडेबुचे, मुख्याध्यापिका अर्चना भोयर, भंडारा जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशन अध्यक्ष ॲड . मधुकांत बाडेबुचे ,शेखर बोरकर, देवचंद चौधरी,  मंगला नागलवाडे, धीरज बांते , सौ. अल्का हटवार,  पार्वताबाई बिसने, राधीका बांते, रंजना भिवगडे, सैनपाल वासनिक, दारासिंग चव्हाण, प्राची मेश्राम, कुसुम सार्वे, मंगला मेहर, मोहनकर ,बिरे, शिल्पा मरकाम, गंगाधर भदाडे, राजु निंबार्ते, जागेश बांते , भावना जगनाडे आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या