भंडारा.: कोणत्याही गावात दोन मतप्रवाहाच्या पार्ट्या असतातच,यात काही नवीन नाही.गावस्तरावर सरपंच हा घटक महत्वाचा आहे,हे संबधित गावच्या समर्थक पार्टीला अभिमानास्पद वाटते,तर विरोधक पार्टी विरोधाची भूमिका बजावन्याचा मोका ताटकळत राहते.अश्या गावांचे विकास आणि त्यात पुनर्वसन करवून घेणे,ही जबाबदारी सध्याच्या विद्यमान सरपंच आणि समर्थक बॉडीला जरा जास्तच त्रासदायक वाटने साहजिकच आहे.
आपल्या कारकीर्दीत आपल्या गावाचा पुनर्वसन करवून घेणे,या बाबीला विशेष महत्व देत अनेक गोसीखुर्द बाधित गावचे सरपंच व समर्थक मंडळी जिल्हा प्रशासनाच्या आणि पुनर्वसन विभागाच्या चकरा मारत असल्याचे प्रमाण वाढले आहे.मात्र अनेक चपला झिजवून हक्क मिळत नाही,यासाठी मागील ६ फेब्रुवारी पासून १५ खापरी वासी आमरण उपोषणावर निर्णय होईपर्यंत बसले होते.
पुनर्वसन आणि प्रकपग्रस्तांना आर्थिक मोबदला देण्यासाठी अवॉर्ड (अंतिम निवाडा) ही प्रक्रिया खूपच महत्वाची असते.यथायोग्य तपासणी करून कोणताही ग्रस्त अंतिम निवड्यातून सुटू नये,याची विशेष काळजी संबधित भूसंपादन अधिकारी आणि पुनर्वसन यंत्रणेची आहे.
मात्र खापरी गावाचा अंतिम निवाडा भ्रष्टाचाराने माखलेला आहे.३६ मालमत्ता धारकांचा अवॉर्ड मध्ये नाव न आल्याने ६ फेब्रुवारी पासून १५ प्रकल्पग्रस्त आमरण उपोषणाला बसले होते.जे गावकरी पिढ्यान् पिढ्या राहत आहेत,तसे लेखी पुरावे असुनही संबधित भूसंपादन अधिकारी आणि पुनर्वसन यंत्रणेने खऱ्या प्रकल्पग्रस्तांना अंतिम निवाडयातून जाणून वगळले आहे.ज्यांचा गावाशी संबंध नाही अशांना अवॉर्ड्मध्ये समाविष्ट करून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यातून अधिकारी अर्धा हिस्सा घेण्याचा डाव उघड झाला आहे.अश्या भ्रष्टांच्या विरोधात खापरी चे १५ प्रकल्पग्रस्त दिनांक ६ फेब्रुवारी पासून जिल्ह्याच्या त्रिमूर्ती चौकात आमरण उपोषणाला बसले होते.त्यांच्यापैकी ३ प्रकल्पग्रस्त महिलांची प्रकृती खालावल्याने प्रशासनातील जबाबदार भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे,जिल्हा पुनर्वसन अधिकारी लीना फलके,जितेंद्र तुरखेडे,कार्यकारी अभियंता,गोसीखुर्द पुनर्वसन विभागीय पथक यांना जाग येताच दिनांक १० फेब्रुवारी ला संयुक्त भेट देवून सर्व माहीत असूनही काहीच माहीत नसल्याचे भासवत सारवा सराव करत उपोषण सोडण्याचा आग्रह केला.पण हक्क मिळत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही,अशी ठाम भूमिका घेण्याचे दिसताच लेखी देवुन जिल्हाधिकारी येताच खापरी येथील अवॉर्ड मधून सुटलेल्या ३६ प्रकल्पग्रस्तांना समाविष्ट करण्याची कारवाही आणि मोबदला वाटपाची कारवाही थांबविण्याचे लेखी आश्वासन दिले.
उपोषण कर्त्या मध्ये खापरी येथील सचीन मेश्राम,गोपाल मेश्राम, विजया मेश्राम,रुपदास बावणे,यशवंत जांभुळे,जगदीश धारणे,महेंद्र क्षीरसागर,आरती शेंडे,प्रगती कैकाडे,मंदा जांभुळे,सुगंधा बोरकर,मंजु रेहपाडे,सीमा जांभुळे,माधुरी बावणे,अमोल रेहपाडे होते.तर अनेक प्रकल्पग्रस्त गावातून बरीच मंडळी जमली होती.यात प्रामुख्याने यशवंत टीचकुले,दीपक पाल,सरपंच निंबार्ते,अंकुश वंजारी आणि एजाजअली सय्यद यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्वच अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून देत खापरी बाबत लेखी पत्र घेऊन उपोषण सुटेपर्यंत स्थळी होते.
0 टिप्पण्या