समर्थ महाविद्यालयाची मोनिका गायधने स्वर्गीय मनोहरभाई पटेल सुवर्ण पुरस्काराने सन्मानित .


Digital Gaavkari 

लाखनी
: येथील समर्थ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी मोनिका दशरथ गायधने रा. तू. म. नागपूर विद्यापीठाच्या बीकॉम 2024 च्या परीक्षेत भंडारा - गोंदिया जिल्ह्यातून प्रथम आल्याबद्दल स्वर्गीय मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोंदिया येथे 9 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या कार्यक्रमात स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या स्मृतिदिनी केंद्रीय उद्योगमंत्री पियुष गोयल व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते तिला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. सध्या ती समर्थ महाविद्यालय लाखनी येथे एम कॉम प्रथम वर्षात शिक्षण घेत असून बँकेत अधिकारी होण्याचे स्वप्न आहे.

याबद्दल समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य दिगांबर कापसे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सुनंदा देशपांडे, डॉ. संगीता हाडगे, डॉ. सुरेश बन्सपाल, प्रा लालचंद मेश्राम, डॉ धनंजय गिरीपुंजे, डॉ. बंडू चौधरी, प्रा बाळू रामटेके, प्रा अजिंक्य भांडारकर तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे याप्रसंगी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या